

Glorious Legacy and Tragic Fall of Tipu Sultan's Family Current Status of Tipu Sultan's Descendants
esakal
टिपू सुलतान हे भारतीय इतिहासातील एक अजरामर व्यक्तिमत्व होते, ज्यांनी ब्रिटीश सत्तेला कडवी झुंज दिली. १७९९ मध्ये श्रीरंगपट्टणमच्या युद्धात त्यांना वीरमरण आले आणि तिथूनच त्यांच्या शाही कुटुंबाच्या अधोगतीला सुरुवात झाली. ब्रिटीशांनी टिपू सुलतानच्या मृत्यूनंतर त्यांच्या १२ मुलांना आणि संपूर्ण कुटुंबाला म्हैसूरमधून हद्दपार करून कोलकात्यात नजरकैदेत ठेवले. एकेकाळी सोन्या चांदीत लोळणारे हे राजघराणे परक्या भूमीत एकाएकी पोरके झाले आणि त्यांच्या संघर्षाचा एक नवा काळ सुरू झाला.