समुद्रात जाऊ नका! हवामान खात्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

कोकण आणि गोवा किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यासह समुद्र खवळलेला असल्याने समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुंबई : कोकण आणि गोवा किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यासह समुद्र खवळलेला असल्याने समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर,खोल समुद्रात शुक्रवारपर्यंत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहाणार आहेत. 

किनाऱ्यापासून 75 किलोमिटर पर्यंत समुद्रात जोरदार वारे वाहाणार आहे तसेच समुद्रही खवळेला राहाणार आहे.त्यामुळे मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला.तर,75 किलोमिटर पुढे पुढील 48 तास समुद्रात ताशी 40 ते 50 किलोमिटर वेगाने वारे वाहाणार आहेत.ही परीस्थीती शुक्रवारी (ता. 12) पर्यंत कायम राहाणार आहे. 

मुंबईतील नरीमन पाईंट येथे समुद्रात बुडून एका तरुणासह 12 वर्षाच्या मुलासा मृत्यू शनिवारी मृत्यू.चौपाट्यांवर महानगर पालिकेने जिव रक्षक आणि अग्निशमन दलाचे जवन पालिकेचे विशेष पथक तैनात केले आहे.मात्र,नरीमन पॉईंट,वरळी सि फेस,वांद्रे अशा खडकाळ किनाऱ्यांवर बचाव कार्य करताना अडचणी येतात.त्यामुळे पावसाळ्याच्या काळात समुद्राच्या पाण्यापासून लांब राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: whether alert that not go to sea