
सोलापूर : प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अजूनही समोर आलेले नाही. दरम्यान, डॉ. शिरीष वापरत असलेले दोन आणि अटकेतील मनीषा माने मुसळे यांच्याकडील एक, अशा तीन मोबाईलचे ‘सीडीआर’ पोलिसांना प्राप्त झाले आहेत. त्याची पडताळणी युद्धपातळीवर सुरू आहे. त्यातून घटनेच्या दिवशी आणि अगोदरच्या एक-दोन दिवसांत डॉक्टरांनी नेमके कोणाला कॉल केले, त्यांना कोणाचे कॉल आले याचा उलगडा होणार आहे. त्यानुसार संबंधितांकडे पोलिसा चौकशी करणार आहेत.