'पक्षविरोधी वागणारे पक्षात दिसणार नाहीत '

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

सातारा - राष्ट्रवादीच्या जिवावर निवडून येऊन आमच्यावरच टीका करणाऱ्यांचे फुगे आणि भांडीही फुटली. काहींना स्वत:चे नाव खूप मोठे वाटत होते, तेसुद्धा संपलेत. ज्यांनी पक्षाचे वाटोळे करण्याची भाषा केली, तेच आता यापुढे पक्षात दिसणार नाहीत, असा टोला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी खासदार उदयनराजेंचे नाव न घेता लगावला. 

दरम्यान, जिल्हा परिषदेत कोण वेडेवाकडे वागले तर त्याची गय केली जाणार नाही, असा दम त्यांनी नूतन सदस्यांना भरला. 

कल्याण रिसॉर्टमध्ये झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्ह्यातील नूतन सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. सुरवातीची भाषण न करण्याची भूमिका बदलून रामराजेंनी नंतर आपल्या भाषणातून सर्वांचा समाचार घेतला. 

"मी अगदी परखडपणे मत मांडणार आहे,' असे सांगत रामराजे म्हणाले, ""मी आता आत्मचिंतन करत आहे. आपल्या जिवावर निवडून आलेले अनेक आहेत. आम्ही पक्षात काम करत असल्यापासून शरद पवारसाहेबांनी जे आदेश दिले, त्यानुसारच काम केले. ज्यावेळी विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली, त्यावेळी अनेक जण आपल्याला सोडून गेले. यापुढील काळात सत्तेला भुलणारे सहकारी आपल्याला नकोत. आपल्याकडे अनेकांनी तक्रारी केल्या. अनेक जण आपल्याला भेटून गेले. ज्यांनी विरोधात काम केले, अशांची एक यादीच तयार आहे. ही यादी मी शशिकांत शिंदे यांच्याकडे देणार आहे. हे लोक आता पुन्हा राष्ट्रवादीत दिसणार नाहीत. आमचे वाटोळे करण्याची भाषा खरे तर विरोधकांनी करायला हवी होती. मात्र, येथे आमच्याच जिवावर निवडून आलेले आमचे वाटोळे करण्याची भाषा करत आहेत.'' 

जिल्हा परिषदेत नवीन सदस्यांना माझी एकच विनंती आहे, की आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करा. उगाच पक्षाची शिस्त बिघडवू नका. काही जणांना तर आपले नाव जिल्ह्यात खूप मोठे असल्याचे वाटत होते. मात्र, काही लोक त्यांच्या कार्याने संपले आहेत. त्यांचे फुगे फुटले, त्यांच्या बाता पोकळ होत्या, ते लोकांच्या लक्षात आले. त्यांची भांडीही आता फुटली आहेत. कोण कसे वागतो आणि कोण काय बोलतो, हे जिल्ह्याला चांगले कळाले आहेत, असेही त्यांनी नमूद केले. 

वेडेवाकडे वागाल, तर जागा दाखवू 
आमदारांनी महिन्यातून एकदा जिल्हा परिषदेचे पदाधिकारी कसे काम करतात, याचा आढावा घेतला पाहिजे, असे सूचीत करून रामराजे म्हणाले, ""जर कोणी वेडेवाकडे वागले तर त्याला त्याची जागा दाखविली जाणार आहे. मी अमुक आमदारांचा समर्थक आहे, असे जर कोणी सांगितले, तर त्याची गय केली जाणार नाही.'' 

Web Title: Who gives the party the opposition parties do not appear