Chandrakant Handore
Chandrakant Handore

Chandrakant Handore: अशोक चव्हाणांनंतर काँग्रेस सावध! राज्यसभेची उमेदवारी दिलेले चंद्रकांत हंडोरे आहेत कोण?

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत १३ फेब्रुवारीला भाजपात पक्षप्रवेश केला.

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत १३ फेब्रुवारीला भाजपात प्रवेश केला. त्यानंतर आता काँग्रेसही खडबडून जागी झालेली दिसतेय. कारण चव्हाणांनंतर काँग्रेसमधील अनेक आमदारही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. बंडखोरीच्या चर्चा असलेल्या चंद्रकांत हंडोरेंनाच काँग्रेसनं राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.

विशेष म्हणजे याच चंद्रकांत हंडोरेंचा गेल्या विधानपरिषद निवडणुकीत पराभव झाला होता. तरीही काँग्रेसनं राज्यातील बंडाळी रोखण्यासाठी सावध पवित्रा घेतलेला दिसतोय. त्यामुळेच विधानपरिषदेत पराभव होऊनही राज्यसभेसाठी चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी दिली आहे. तरी, आता हे चंद्रकांत हंडोरे नेमके कोण? त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे, ते जाणून घेऊयात-

Chandrakant Handore
भारतासह 'या' 10 देशांमध्येही सुरु आहे शेतकऱ्यांचं आंदोलन

देशातील १५ राज्यांमधील ५६ जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला राज्यसभेची निवडणूक होत आहे. यापैकी महाराष्ट्रातून ६ जागा आहेत. तरी, ६ पैकी एका जागेवर काँग्रेसनं आपला उमेदवार घोषित केला आहे. तर, भाजपकडून ५ जागांवर उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे. पण इथेही भाजपाकडून मात्र अद्याप किती जागांवर उमेदवार दिले जाणार याबाबत १५ फेब्रुवारीला कळेल असं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. (Marathi Tajya Batmya)

Chandrakant Handore
Vibhakar Shstri: भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शात्री यांच्या नातवाचा काँग्रेसला रामराम

खरंतर देशभर आता निवडणुकांचं वातावरण तयार होत आहे. अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या महाराष्ट्रासह १५ राज्यांतील ५६ जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला निवडणूक जाहीर केली आहे. यासाठी, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आजच त्यांचे ४ उमेदवार जाहीर केले आहेत. राजस्थानमधून सोनिया गांधी, बिहारमधून डॉ. अखिलेश सिंह, हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनु सिंघवी आणि महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Chandrakant Handore
Farmers Protest: भारतातच नव्हे 'या' देशांमध्येही सुरु आहेत शेतकरी आंदोलनं; जाणून घ्या...

चंद्रकांत हंडोरेंची कोण आहेत?

  1. १९८५ साली मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आणि राजकीय प्रवासाला सुरुवात झाली

  2. १९९२-९३ मध्ये आपले खास राजकीय कौशल्य वापरून मुंबईचे महापौरपदही मिळविले.

  3. पुढे कालांतराने ते काँग्रेसमध्ये दाखल झाले.

  4. २००४ मध्ये हंडोरे चेंबूर मतदारसंघातून निवडून आले आणि विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले.

  5. सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले होते. मंत्रिमंडळातही आक्रमक मंत्री म्हणून त्यांची चर्चा असायची.

  6. २००९ मध्ये ते दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले, परंतु त्यांना अंतर्गत स्पर्धेत मंत्रिपद मिळू शकले नाही.

  7. २०१४ ते २०२१ या काळात महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष

  8. २०२० पासून ते मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारीही आहेत.

  9. हंडोरे हे आंबेडकरवादी नेते असून सामाजिक-राजकीय संघटना 'भीम शक्ती'चे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.

  10. काँग्रेसमध्ये असूनही त्यांनी भीमशक्ती नावाचा आपला दबाव गट कायम तयार ठेवला.

  11. तरी, सध्या ओबीसी, अल्पसंख्यांक आणि सामाजिक परिस्थितीवरुन तापलेलं राजकारण पाहता सामाजिक प्रयोगशीलतेचा चेहरा म्हणून काँग्रेसला हंडोरे यांना संसेदत नेण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

Chandrakant Handore
Shivsena: शिंदेच्या शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर; 'या' बड्या नेत्याला मिळाली संधी

विधानपरिषदेत पराभव

खरंतर, २०२२ साली विधान परिषदेच्या निवडणुकीतही चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, मतफुटीमुळे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाल्याचं म्हटलं गेलं. याप्रकरणी काँग्रेसकडून चौकशी समितीही गठीत करण्यात आली होती. त्यामुळे विधानपरिषदेत पराभूत होऊनही बंडखोरी टाळण्यासाठी काँग्रेसनं आता सावध खेळी केलेली दिसत आहे. आणि महाराष्ट्रातून एकाच जागेवर चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे. (Latest Maharashtra News)

Chandrakant Handore
Sharad Pawar: शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का? मोदी बागेत बैठकींचं सत्र सुरु

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक झाली. याशिवाय चेन्नीथला यांच्यासोबतच काँग्रेसचं शिष्टमंडळ महाविकासआघाडी आणि इंडिया आघाडीचे घटकपक्ष असणाऱ्या शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या पवार गटाच्या प्रमुखांची भेट घेतली. त्यामुळे येत्या राज्यसभा निवडणुकीत एकच उमेदवार देऊन त्याला जिंकून आणण्याचं आव्हान आता काँग्रेससोबतच महाविकासआघाडीसमोर आहे. तरी, आता हंडोरे बिनविरोध निवडून येतात की भाजपा नवी खेळी करते हे पाहणं महत्वाचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com