
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गोपीचंद पडळकर हे नाव चर्चेचा विषय ठरलं आहे. नुकत्याच झालेल्या विधिमंडळातील हाणामारी प्रकरणाने त्यांनी पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं. जितेंद्र आव्हाड यांनी वापरलेल्या “मंगळसूत्र चोर” या शब्दामुळे पडळकरांचे कार्यकर्ते आणि आव्हाडांचे कार्यकर्ते यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेनंतर पडळकरांनी माफी मागितली, पण प्रश्न उपस्थित झाला आहे की, विधानभवन हे जनतेच्या प्रश्नांसाठी आहे की राड्यासाठी? पडळकरांचा आक्रमक स्वभाव आणि शरद पवार यांच्यावरील सातत्याने होणारी टीका यामुळे ते नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहतात. पण कोण आहेत हे गोपीचंद पडळकर? आणि ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवडते नेते कसे झाले?