Padmakar Valvi: नारायण राणेंनी किडनॅप केलेले पद्माकर वळवी... आता पुन्हा काँग्रेसच्या कुशीत! २००२ मध्ये काय घडलं होतं?

Padmakar Valvi returns to Congress from BJP | २००२ मध्ये नारायण राणेंचा डाव, आमदारांचे अपहरण, मातोश्री क्लबचा पहारा, पद्माकर वळवींचा पळून जाण्याचा प्रयत्न आणि देशमुख सरकारचा बचाव!
who is Padmakar Valvi-
who is Padmakar Valvi-esakal
Updated on
Summary
  1. नंदूरबारचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी भाजप सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

  2. त्यांनी गेल्या वर्षी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

  3. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस संघटना मजबूत करण्याच्या हालचालींमध्ये हा मोठा धक्का भाजपला बसला.

  4. पद्माकर वळवी २००२ मध्ये नारायण राणेंनी ‘किडनॅप’ केल्यामुळेही चर्चेत आले होते.

  5. त्यांच्या ‘घरवापसी’मुळे नंदूरबार जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचे मानले जाते.

Who Is Padmakar Valvi

विधानसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर राज्यातील पक्षसंघटना पुन्हा उभी करण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. नंदूरबारचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गतवर्षी त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता, पण अवघ्या वर्षभरातच त्यांनी ‘घरवापसी’ केली आहे.

मात्र पद्माकर वळवी हे नाव केवळ पक्षांतरामुळेच नाही तर एका जुन्या राजकीय थरारक किस्स्यामुळेही चर्चेत राहिले आहेत. २००२ मध्ये त्यांना नारायण राणेंनी ‘किडनॅप’ केल्याची घटना गाजली होती. नेमके कोण आहेत पद्माकर वळवी? राणेंनी त्यांचं अपहरण का केलं होतं? चला, हा किस्सा जाणून घेऊया…

साल २००२... महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचं युती सरकार होतं. मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख. याआधी १९९९ पर्यंत सत्ता शिवसेना-भाजपकडे होती आणि नारायण राणे मुख्यमंत्री होते. पुन्हा गादीवर यायचं ठरवून राणेंनी मोठा डाव टाकला. त्यांना साथ होती बाळा नांदगावकर यांची.

शेकाप आमदारांचा बंडखोरीचा सुर

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत सुनिल तटकरे यांनी शेकापच्या उमेदवाराला हरवलं, असा समज शेकापकडे होता. त्यामुळे देशमुख सरकारला शेकापच्या ५ आमदारांनी पाठींबा काढून घेतला. सरकार अल्पमतात आलं आणि राणेंना संधी मिळाली.

आमदारांना ‘मातोश्री स्पोर्ट क्लब’मध्ये डांबून ठेवणे

५ जून २००२ रोजी राणेंनी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या काही आमदारांना मुंबईच्या जोगेश्वरीतल्या मातोश्री स्पोर्ट क्लबमध्ये ठेवून टाकलं. बाहेर शिवसैनिकांचा कडेकोट बंदोबस्त होता. पत्रकारांनाही तिथे भटकण्याची परवानगी नव्हती.

पद्माकर वळवींचा पळून जाण्याचा प्रयत्न

या दरम्यान काँग्रेस आमदार पद्माकर वळवी क्लबमधून बाहेर पडले आणि एका रिक्षात बसले. पण शिवसैनिकांनी त्यांना पुन्हा क्लबमध्ये आणलं. मात्र त्यांच्या या प्रयत्नाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि वातावरण तापलं.

who is Padmakar Valvi-
Mumbai BMC Election Explained: मुंबई मनपात भाजपचं गणित फसणार? शिंदे फक्त चेहरा, उद्धव ठाकरेंची खरी गरज! काय सांगतात आकडे?

पोलिसांची धडक कारवाई

गृहमंत्री छगन भुजबळ यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. रात्री क्राईम ब्रांचचे डीसीपी, एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि १०० पोलिसांचा ताफा क्लबवर पोहोचला. राणे गाढ झोपेत होते, पण पोलिस पाहताच त्यांनी शिवीगाळ केली व धमक्या दिल्या. त्यामुळे वातावरण आणखीनच तणावग्रस्त झालं.

पत्रकार परिषद आणि आमदारांचा जबाब

पुढच्या दिवशी राणेंनी पत्रकार परिषद बोलावली. आमदारांनी ते आपल्या इच्छेने क्लबमध्ये असल्याचं सांगितलं. यावेळी भाजप नेते गोपीनाथ मुंडे देखील उपस्थित होते.

who is Padmakar Valvi-
Explainer: विरोधकांचं कथित आयफोन हॅक प्रकरण काय? हॅकर्सपर्यंत पोहोचण्यात काय आहेत अडचणी?

विधानसभा भवनातील नाट्य

१३ जून २००२ रोजी विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी शिवसैनिकांनी आमदारांना विधानभवनात आणलं. पण पद्माकर वळवी पुन्हा पळून गेले आणि थेट विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती यांच्याकडे गेले. त्यांनी जिवाला धोका असल्याचं सांगत संपूर्ण कहाणी उघड केली. त्यांना तातडीने सुरक्षा देण्यात आली.

सात आमदार अयोग्य, देशमुख सरकार वाचलं

विश्वासदर्शक ठरावाआधी अध्यक्षांनी सात आमदारांना अयोग्य ठरवलं. मतदानाचा आकडा २८८ वरून २८१ वर आला. शेकाप आमदारांनी मतदान टाळलं. बहुमताचा आकडा १३८ होता, तर विलासराव देशमुखांना १४३ मते मिळाली. सरकार वाचलं.

शेवटचा संघर्ष आणि राणेंची संधी हुकली

मतदानानंतर विधानसभेबाहेर शिवसैनिक आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत दगडफेक, लाठीचार्ज झाला. मात्र एवढ्या गदारोळानंतरही राणेंची मुख्यमंत्रीपदाची संधी हातातून निसटली.

who is Padmakar Valvi-
Raj–Uddhav Alliance: राज–उद्धव युतीचा बिग गेम! चार महापालिका काबीज करण्याचा मास्टरप्लॅन उघड, भाजप-शिंदे सेनेसमोर महाअडथळा

FAQs

प्रश्न १: पद्माकर वळवी कोण आहेत?
(Who is Padmakar Valvi?)
➡️ ते नंदूरबारचे ज्येष्ठ आदिवासी नेते आणि माजी मंत्री आहेत.

प्रश्न २: पद्माकर वळवी कोणत्या पक्षात आहेत?
(Which party does Padmakar Valvi belong to now?)
➡️ सध्या ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आहेत.

प्रश्न ३: त्यांनी भाजपमध्ये कधी प्रवेश केला होता?
(When did Padmakar Valvi join BJP?)
➡️ त्यांनी २०२३ मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

प्रश्न ४: त्यांचं नाव २००२ मध्ये का गाजलं होतं?
(Why was Padmakar Valvi in the news in 2002?)
➡️ नारायण राणेंनी त्यांना मातोश्री स्पोर्ट क्लब प्रकरणात ‘किडनॅप’ केल्याचा किस्सा चर्चेत आला होता.

प्रश्न ५: काँग्रेससाठी त्यांचा प्रवेश किती महत्त्वाचा आहे?
(How important is his return for Congress?)
➡️ त्यांच्या परतीमुळे नंदूरबार आणि आदिवासी पट्ट्यात काँग्रेसला मोठा फायदा होईल, असं मानलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com