

Praful Patel Loyalist Gets NCP Rajya Sabha Nomination
Esakal
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेवर गोंदिया येथील ‘राष्ट्रवादी’चे माजी आमदार राजेंद्र जैन यांची वर्णी लागली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीआधी मंत्री छगन भुजबळ यांच्या ‘सातपुडा’ निवासस्थानी एक बैठक झाली. दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे असे नेते या बैठकीस उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिल्लीतील वरिष्ठांकडून आलेल्या निरोपाबाबत याबैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत जैन यांचे नाव निश्चित करण्यात आले. राष्ट्रवादीकडून या नावासाठी छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत होते. दुसरीकडे नवनीत राणा यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. मात्र राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. Rajendra Jain Emerges as NCP's Surprise Rajya Sabha Choice