Video : 'बारमध्ये पहाटेपर्यंत असलेला अन् पोलिसांशी हुज्जत घातलणारा तो भाजप नेता कोण?', राऊतांच्या दाव्याने खळबळ

sanjay raut tweet
sanjay raut tweetesakal

मुंबईः ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. राऊतांनी एक व्हीडिओ शेअर करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्हीडिओमध्ये एक व्हीडिओ शेअर करुन तो एक भाजप नेता असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत यांनी ट्विटमध्ये सदरील व्हीडिओ पाहटे साडेतीन वाजताचा असल्याचं सांगून कायद्याचे धिंडवडे उडवले जात असल्याचा आरोप केला आहे.

संजय राऊत ट्विटमध्ये म्हणतात, '' पहाटे 3.30. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोणाच्या खिशात आहेत? शेवटपर्यंत पहा. पोलिस हतबल आहेत.. हे तर काहीच नाही.. कायद्याचे धिंडवडे काढणारे फुटेज मी पोलिस आयुक्तांना पाठवत आहे.. मी वाट पाहतोय पोलिस काय कारवाई करत आहेत.. हिंदुत्व नशेच्या व्यापारात अडकले आहे.''

संजय राऊतांनी हा विषय थेट हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणून सोडला आहे. शिवाय काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही असा दावा केला.

हा व्हीडिओ दोन दिवसांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे. एक भाजप नेता उशिरापर्यंत पोलिसांशी हुज्जत घालत होता. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या नेत्याला पाठिशी घालत आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अतुल लोंढे ट्विटमध्ये म्हणतात, ''फडणवीसजी आपले लाडके बँक बुडवे रात्री ३ वाजता डांस बारमध्ये.. त्यांच्यासाठी पहाटेपर्यंत डान्स बार चालू ठेवण्याची सूट आपण पोलिसांना दिली आहे का ? महाराष्ट्रात नेमके कोणाचे राज्य आहे? कायद्याचे की बँक बुडव्यांचे आणि डान्सबारवाल्यांचे?''

असा सवाल अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे हा भाजप नेता कोण? असा प्रश्न उपस्थित होतोय. पहाटेपर्यंत बार उघडं कसं? यासंदर्भात चर्चा रंगल्या आहेत. संजय राऊत आणि अतुल लोंढे यांच्या दाव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com