

Ambad Tehsildar Held While Accepting ₹6 Lakh Bribe
Esakal
बीड जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण हे त्यांच्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे जिल्ह्यासह सोशल मीडियावरही नेहमीच चर्चेत असायचे. सोशल मीडियावर ३२ हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या विजय चव्हाण यांनी शेतीच्या बांधावर जाऊन नागरिकांचे प्रस्न सोडवल्याचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. कुणाचा रस्त्याचा प्रश्न, कुणाचा जमिनीचा वाद, भाऊबंदकीही त्यांनी सोडवली. इतकंच नाही तर सरकारी योजना पारदर्शकपणे पोहोचाव्या यासाठी सोशल मीडियावर मार्गदर्शनही केलं. मात्र आता याच अधिकाऱ्याला अवैध वाळू उपसा प्रकरणी कारवाई न करण्यासाठी ६ लाखांची लाच घेताना अटक झाल्यानं खळबळ उडाली आहे. Ambad Tehsildar Arrested Over Rs 6 Lakh Bribe Case