PN Patil: काँग्रेस अनेकदा फुटली पण सडोलीचा पाटील हलला नाही... २० वर्षे एकहाती किल्ला लढवणारे पीएन कोण होते ?

Kolhapur Congress: 1985 पासून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सलग 31 वर्षे संचालक म्हणून काम केले. 1990 ते 1995 या काळात ते मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते. याचबरोबर सलग 20 वर्षे ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते.
Congress MLA PN Patil Karveer, Kolhapur.
Congress MLA PN Patil Karveer, Kolhapur.Esakal

कोल्हापुरातील करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी.एन पाटील यांचे आज निधन झाले. बाथरूमध्ये पडल्याने डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे त्यांनी वयाच्या 71व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून नाव कमावलेल्या पी.एन पाटलांनी अखेरपर्यंत काँग्रेसशी प्रमाणिक राहत पक्ष आणि निष्ठा याचा आदर्श आजचे राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांसमोर ठेवला आहे.

पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी.एन पाटील या नावाने प्रसिद्ध असलेले पी.एन पाटील सडोलीकर यांच्या जन्म 6 जानेवारी 1953 रोजी कोल्हापुरातील सडोली खालसा या गावी झाला.

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ते आमदारकीपर्यंत झेप मारणाऱ्या पाटील यांची राजकीय कारकीर्द कौतुकास्पद आहे. सुरुवातीपासूनच सर्वांना बरोबर घेऊन राजकारण करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांनी जिल्ह्यात अनेक माणसे कमावली. त्याचाच फायदा त्यांना पुढे राजकारणात झाला.

Congress MLA PN Patil Karveer, Kolhapur.
PN Patil Death: झुंज अपयशी! करवीरचे आमदार पी.एन पाटील यांचे निधन, बाथरूमध्ये पडल्याने डोक्याला झाली होती गंभीर दुखापत

काँग्रेस फुटली पण् पी.एन...

1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेमुळे महाराष्ट्र काँग्रेमध्ये सर्वात मोठे वादळ आले. यामध्ये राज्यभरातून काँग्रेसमधील अनेक मतब्बर नेत्यांनी शरद पवार यांचे नेतृत्त्व मान्य करत काँग्रेस सोडली. याला कोल्हापूर जिल्हाही अपवाद नव्हता. जिल्ह्यातीन अनेक छोटे मोठे पुढारी राष्ट्रवादीत सहभागी आहे.

जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष जवळपास रिकाम झाला होता, अशा कठीण परिस्थितीत पी.एन पाटील यांच्या खांद्यावर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आली. कोणतीही तक्रार न करता पी.एन पाटील यांनी 1999 पासून 2019 पर्यंत तब्बल 20 वर्षे ही जबाबदारी पार पडली. या काळात त्यांच्या यशापयशांचा विचार न करता त्यांनी केलेले काम कौतुकास्पदच होते.

Congress MLA PN Patil Karveer, Kolhapur.
जीव वाचवण्यासाठी आलेली SDRF ची बोट उलटली! नगरच्या प्रवरा नदीत तिघांचा मृत्यू तर दोघांचा शोध सुरु

पी.एन. पाटील यांची कारकिर्द

पी. एन . पाटील यांचा जन्म सडोली खालसा येथे एका राजकीय दृष्टया मात्तबर घराण्यात ६ जानेवारी १९५३ ला झाला.

कोल्हापूर जिल्ह्याचे माजी राज्यमंत्री व ज्येष्ठ नेते कै. श्रीपतराव बोंद्रे यांचे ते जावई होते. भोगावती कारखान्यांच्या माध्यमांतून सहकार व शैक्षणिक संस्था च्या उभारणीतून त्यांच्या सावर्जनिक कामाला प्रारंभ झाला.

करवीर, राधानगरी हे त्याचे कार्यक्षेत्र होते. 2004 मध्ये सांगरुळ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सहकार्याने मतदारसंघाचा विकास साधला.

1985 पासून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सलग 31 वर्षे संचालक म्हणून काम केले. 1990 ते 1995 या काळात ते मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते.

काँग्रेसमध्ये अनेक नेते येत होते अनेकजण जात होते मात्र, पी.एन. पाटील मात्र तिथेच आपल्या पक्षाशी एकनिष्ठ होते. म्हणूनच त्यांना पक्षाने कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदाची सलग वीस वर्षे संधी दिली होती.

पी.एन. पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत दोन वेळा विधानसभेत जाण्यात यश मिळवले. 2004 मध्ये ते पहिल्यांदा सांगळुर मतदारसंघातून आमदार झाले होते. तर 2019 मध्ये त्यांनी करवीर मतदारसंघातून विजय मिळवला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com