BJP Future CM: भाजपमधून भविष्यात मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य

५ विधानसभा निवडणुकांमध्ये केंद्रातील भाजपची रणनीती बघता महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार? हा मोठा राजकीय प्रश्न निर्माण झाला आहे.
BJP Future CM
BJP Future CM

BJP Future CM: आगामी काळात भाजपकडून मुख्यमंत्री कोण होणार?, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचक वक्तव्य केलं आहे. सभागृहात आज खेळीमेळीचे वातावरण होते. यावेळी फडणवीसांनी संधी साधत हलक फुलकं विधान केलं. मात्र ५ विधानसभा निवडणुकांमध्ये केंद्रातील भाजपची रणनीती बघता महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार, हा मोठा राजकीय प्रश्न निर्माण झाला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्या पक्षात मंत्र्यांपेक्षा महामंत्री मोठा असतो. एक लक्षात ठेवा आमच्याकडे कोण मुख्यमंत्री होईल हे सांगता येत नाही. सर्वांनी आशा ठेवावी, सर्वांचे अच्छे दिन येणार आहेत. 

यावेळी विरोधकांनी गिरीश महाजन यांचे नाव घेतले. त्यावर गिरीश महाजन वरिष्ठ आहेत. वरिष्ठ लोकांचा स्कोप थोडा कमी केला, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावाला. 

BJP Future CM
Devendra Fadnavis: केंद्राकडून महाराष्ट्रात हिरे अन् दागिन्यांच्या उत्पादनासाठी ८२ कोटी रुपये; फडणवीसांची विधानसभेत माहिती

भाजपमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत केंद्रातील वरिष्ठ नेते निर्णय घेतात. नुकत्याच झालेल्या ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्री दिलेले चेहरे अनपेक्षित होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदासाठी भाजप कुणाला संधी देणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

BJP Future CM
New Laws: गुन्हे करुन परदेशात लपलेल्या गुन्हेगारांविरोधात आता खटला चालणार; झटपट शिक्षाही होणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com