Eknath Shinde: CM शिंदे खरंच नाराज आहेत का? साताऱ्याला कशासाठी गेले? स्वतः केलं स्पष्ट

मुख्यमंत्री नाराज असल्यानं अचानक मुंबईतून गावी गेल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत.
Eknath shinde
Eknath shindeEsakal

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताऱ्यातील दरी या आपल्या मूळगावी गेले आहेत. यात्रेनिमित्त ते तीन दिवस गावी असतील असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं होतं. पण मुख्यमंत्री नाराज असल्यानं अचानक मुंबई सोडून गावी गेल्याच्या चर्चा सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर आपण साताऱ्यात का आलो आहोत, हे नुकतंच पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्वतः स्पष्ट केलं आहे. (Why did CM Eknath Shinde go to Satara gives explanation by himself)

Eknath shinde
Karnatka Election 2023: कर्नाटकात काँग्रेसची हवा? सी व्होटरचा सर्व्हे काय सांगतो वाचा

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी साताऱ्यात आल्यानंतर महाबळेश्वर-तापोळा रस्त्याचं भूमिपूजन केलं, या कार्यक्रमात मला हजारो लोक भेटले. आजही अधिकाऱ्यांची बैठक पार पडली, ती देखील महत्वाची होती. त्यामुळं घरी अडीच वर्षे बसलेल्यांनी मी दोन-तीन दिवस इकडे गेलो तिकडे गेलो यावर बोलायचं म्हणजे नवलचं आहे.

Eknath shinde
Mumbai High Court: "भटक्या कुत्र्यांना पिण्यासाठी पाणी द्या"; हायकोर्टाचे सोसायट्यांना निर्देश

नाणार प्रकल्पाला विरोध झाला तेव्हा बारसूमध्ये ग्रीन रिफानरी असल्यानं प्रदुषण होणार नाही, असं अश्वस्त केलं आहे. बारसू या ठिकाणी रिफायनरी व्हावी, तिथल्या भागाचा विकास व्हावा, लोकांना रोजगार मिळावा, हजारो कोटींची गुंतवणूक तिथं होऊ शकते. यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होतं. त्यामुळं त्यांनीच या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे.

Eknath shinde
Arvind Kejriwal: केजरीवालांची होतेय हेरगिरी? मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ ड्रोन दिसल्यानं खळबळ

चांगल्या कामला विरोध करणं हा एकप्रकारचा दुटप्पीपण आहे. विरोधकांनी विरोधाला विरोध करण्यापेक्षा चांगल्या प्रकल्पाला मदत केली पाहिजे, स्वागत केलं पाहिजे. बारसूमध्ये सध्या मातीचं परीक्षण सुरु आहे, बोअर घेतले जात आहेत. हे बोअर लोकांच्या संमतीनं घेतले आहेत. जवळपास साठ ते सत्तर टक्के लोकांच्या संमतीनं हे काम सुरु आहे. अद्याप कुठलाही प्रकल्प तिथं आला आणि काम सुरु होणार अस कुठलंही काम सुरु नाही. जसा समृद्धी हायवे आम्ही लोकांच्या संमतीनं केला त्याचप्रकारे हा प्रकल्प देखील रेटून न नेता लोकांच्या संमतीनंच घेणार आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com