

Baba Adhav Ak Gaav Ak Paanvatha Movement
ESakal
बाबासाहेब पांडुरंग आढाव हे हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि कामगार चळवळीचे आधारस्तंभ मानले जातात. त्यांच्या कार्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे 'हमाल पंचायत'ची स्थापना. ज्याद्वारे त्यांनी पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील हमालांना संघटित केले. त्यांनी जातीभेदाविरुद्ध लढण्यासाठी आणि समाजात समानता प्रस्थापित करण्यासाठी 'एक गाव एक पानवठा' या क्रांतिकारी चळवळीचे नेतृत्व केले होते. ही चळवळ त्यांना का करावीशी वाटले, याचे उत्तर त्यांनी दिले होते. तसेच या चळवळीत डॉक्टर नरेंद्र दाभोलकर त्यांच्यासोबत होते. त्यांच्यासोबतचा अनुभवही आढाव यांनी सांगितला.