तुम्हाला हे माहितीय का? श्रावणात दुर्वा, बेल, आघाडा का महत्त्वाचा मानला जातो; आजीबाईचा बटवा एका पिढीकडून दुसऱ्याकडे नेणारा श्रावण

श्रावणात अनेक रानभाज्या पाहायला मिळतात आणि त्या अतिशय पौष्टिक असतात. या महिन्यात उपवास, व्रत मोठ्या प्रमाणावर केले जातात. श्रावणा पूजेला लागणारे साहित्य (दूर्वा, आघाडा, बेलाची पाने, पांढरी फुले, नाराळ वगैरे) व शाकाहारी जेवणातील रानभाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
mahashivratri special healthy remedies for bells and warts tips healthcare marathi news
mahashivratri special healthy remedies for bells and warts tips healthcare marathi newssakal

सोलापूर : श्रावणात अनेक रानभाज्या पाहायला मिळतात आणि त्या अतिशय पौष्टिक असतात. या महिन्यात उपवास, व्रत मोठ्या प्रमाणावर केले जातात. श्रावणा पूजेला लागणारे साहित्य (दूर्वा, आघाडा, बेलाची पाने, पांढरी फुले, नाराळ वगैरे) व शाकाहारी जेवणातील रानभाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. याच काळात घरातील ज्येष्ठ लोक त्याचे महत्त्व तरुणांना सांगतात आणि तो वसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो.

श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा किंवा सणांचा राजा म्हटले जाते. संपूर्ण भारतीय उपखंडासाठी श्रावण महिना खूप महत्त्वाचा आहे, कारण तो नैऋत्य मॉन्सूनच्या आगमनाशी जोडलेला आहे. तसेच पावसाळ्यात रानात उगवलेल्या रानभाज्यांचे सेवन होते, जे शरीराच्या तंदुरुस्तीसाठी फायद्याचे ठरते. पूजेसाठी साहित्य गोळा करताना महिला रानात जातात, त्यावेळी स्वच्छ हवा मिळते. फुलांच्या वासातून त्यांना आनंद मिळतो.

निसर्गाचे सौंदर्य पाहून त्यांच्यात निसर्गाविषयी गोडी निर्माण होते. दुसरीकडे श्रावणात मंगळागौरीचे पूजन झाल्यावर सायंकाळी सर्व महिला एकत्रित येतात. त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारची फुगडी, तसेच झिम्मा, तळ्यात-मळ्यात, खुर्ची की मिर्ची, नाच गं घुमा, तिखट मीठ मसाला, तांदूळ सडू बाई, कीस बाई कीस... दोडका कीस, आगोटं-पागोटं, आवळा वेचू की कवळा वेचू, नखोल्या, सोमू-गोमू, काच-किरडा, धोबीघाट, होडी, मासा, भोवर भेंडी, अडवळ घूम, पडवळ घूम, गोफ असे मजेदार व मिश्कील खेळ रंगतात. त्यातून शारीरिक व विशेषतः: मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते.

आरोग्यदायी बेल, आघाडा अन्‌ दूर्वा

१) बेल...

श्रावणात रोज किंवा सोमवारी तरी महादेवाला बेल वाहतात. बेलाच्या बेलफळांचा बेल मुरब्बा करतात. बेलमुरब्ब्याचा उपयोग अतिसार, जुलाब यावर खूप चांगला होतो. आव, शेम पडणे, रक्त पडणे यावर बेलफलातील गर किंवा बेलमुराब्बा द्यावा. लहान मुलांना सारखी आव होत असल्यास त्यावरही बेल मुरब्बा देतात, पण तत्पूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.

-------------------------------------------------

२) आघाडा...

जीवती पूजन, मंगळागौरीला, बुध-बृहस्पती, ज्येष्ठा गौरी, हरतालिका व गणपती पूजनात आघाड्याला विशेष महत्त्व आहे. आयुर्वेदात आघाड्याला ‘अपामार्ग’ म्हणून ओळखतात. आघाड्यापासून क्षार तयार करतात. त्याचा उपयोग मुतखड्यावर होतो. अपामार्ग क्षाराच्या तेलाचा वापर बहिरेपणा, कानात विविध आवाज येतात, त्यावेळी होतो. आघाड्याची राख मिसळून तिळाचे तेल कानदुखी व व्रणावर बाहेरून लावतात. आघाड्याच्या काड्या दात घासण्यासाठीही करतात. त्वचारोग व खोकल्यावर आघाड्याचा काढा उपयोगी आहे. आघाडा कफ कमी करतो. पायात बाभळीचा काटा घुसल्यास आघाड्याचा रस लावतात. लघुशंका साफ करण्यासाठी आघाड्याच्या कोवळ्या पानांची भाजी उपयोगी ठरते. या भाजीने हाडे मजबूत होऊन शरीरातील मेद कमी होतो.

-----------------------------------------------------

३) दूर्वा...

दूर्वा हे गवत रक्त शुद्ध करताना पित्त आणि कफ दोषदेखील कमी करते. अ‍ॅसिडिटी ते लठ्ठपणापर्यंत आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यापासून ते हिरड्यांमधून रक्त येण्यापर्यंत दूर्वा गवत काम करते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि थकवाही कमी होतो. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानांसह दूर्वा घास खाऊ शकता. आयुर्वेदानुसार दूर्वा घास लठ्ठपणावर नियंत्रण ठेवू शकतो. एक चमचा जिरे, ४-५ काळी मिरी आणि थोडी दालचिनी दूर्वा घास मिसळून बारीक करा आणि ते गाळून दिवसातून दोनदा, ताक किंवा नारळाच्या पाण्यात पिल्यास फरक पडतो, असे तज्ज्ञ सांगतात.

श्रावण हा धार्मिकसोबतच शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी खूप

महत्त्वाचा महिना मानला जातो. आजीबाईचा बटवा म्हणजेच वेगवेगळ्या रानभाज्या, पूजेवेळी वाहिले जाणाऱ्या साहित्याची माहिती ज्येष्ठांकडून कुटुंबातील तरुणांना मिळते. वर्षा ऋतूत (श्रावणात) शरीरातील पंचमहाभूतांपैकी अग्नी कमी झालेला असतो आणि त्यामुळे वातदोष वाढतो. या महिन्यात उपवासाला फार महत्त्व आहे, पण उपवास केल्यावर कितीही प्रमाणात उपवासाचे पदार्थ खाऊ नयेत.

- डॉ. गायत्री देशपांडे, आयुर्वेदतज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com