Sharad Pawar : एका मुलीनंतर का केली कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया? पवारांनी सांगितलेलं कारण

शरद पवारांनी वैयक्तिक आयुष्यातही काही असे निर्णय घेतले की जे आजही आश्चर्यचकीत करणारे आहे.
Sharad Pawar
Sharad Pawarsakal

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्ताधर्ता शरद पवार हे उत्तम राजकारणी म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास शरद पवारांशिवाय अपूर्ण आहे. त्यांनी केंद्रात सुद्धा खूप महत्त्वाच्या भूमिका बजावल्या.

शरद पवारांनी राजकीय कार्यकाळात त्यांनी अनेक अचंबित करणारे निर्णय घेतले मग ते देशपातळीवर असो की राज्यपातळीवर पण तुम्हाला खूप कमी लोकांना माहिती असेल की शरद पवारांनी वैयक्तिक आयुष्यातही काही असे निर्णय घेतले की जे आजही आश्चर्यचकीत करणारे आहे. असाच एक निर्णय होता एका मुलीनंतर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करणे.

आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (why ncp leader Sharad Pawar decided surgery for family planning after daughter Supriya sule)

Sharad Pawar
Supriya Sule : पहिल्या नजरेत भावली पवारांची लेक, वाचा सदानंद अन् सुप्रिया सुळेंची लव्हस्टोरी

शरद पवारांची एकूलती एक लेक सुप्रिया सुळे यांनी कोण ओळखत नाही! त्यांनी त्यांच्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत राजकारणात आपलं वर्चस्व स्थापन केलं आहे आणि त्या आता केंद्रात सक्रीय आहे.

आता शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्ती जाहीर केल्यानंतर सध्या राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष म्हणून सुप्रिया यांचं नाव समोर येत आहे. अर्थातच शरद पवारांची मुलगी असल्याने त्यांचा हक्क अधिकच आहे.

Sharad Pawar
Supriya Sule यांना सकाळी माॅर्निग वाॅकला जाताना सफाई कर्मचारी काय म्हणाला...

एक वेळ अशी आली की एका मुलींनंतर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला होता. याबाबत दुरदर्शनवर दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत शरद पवार सांगतात की मुलगा आणि मुलीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलण्याची गरज होती. जर आपण मुलीला मुलासारखी समान वागणूक दिली तर तीसुद्धा उत्तम प्रकारचं काम करुन शकते. त्यामुळे मुलगा होण्याचा अट्टहास कशाला?

Sharad Pawar
Sharad Pawar: शरद पवारांनी घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयानंतर बारामतीकरांना धक्का

इतरांना मुलगा मुलगी समान असल्याचे सल्ले देताना आधी आपण ते आचरणात आणायला हवं, म्हणून त्यांनी त्यांची पत्नी प्रतिभा पवार यांच्या सहमतीने हा निर्णय घेतला होता. त्यावेळी काँग्रेस पक्षाने कुटुंब नियोजनाला सुरुवात केली होती आणि याची सुरुवात पवारांनी स्वत:पासून केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com