मुंबई - ‘पंतप्रधान मोदी यांनी ‘रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही’,‘मेरी रग रग मे खून नही सिंदूर बहे रहा है,’ असे ठणकावले होते. ऑपरेशन सिंदूर थांबलेले नाही, असे संरक्षणमंत्री म्हणाले होते. मग आता पाकिस्तानविरोधात क्रिकेट खेळायला परवानगी कशी देता?.आता गरम सिंदूरचे शीतपेय झाले का? घराघरात सिंदूर वाटलात, मग त्या भाकडकथा होत्या का?, असा सवाल करून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला धारेवर धरले.ठाकरे यांनी शिक्षक सेनेच्या कार्यक्रमात केंद्र सरकारवर निशाणा साधला. ‘कबुतरांसाठी लोक हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतात. कुत्र्यासाठी आणि हत्तीणीसाठी पण लोक रस्त्यावर उतरून लढा देतात..ही चांगली बाब असून भूतदया, माणुसकी हवीच. पण ज्यावेळी पहलगाममध्ये आपल्याच देशाचे निष्पाप नागरिक मारले गले, सैनिक हुतात्मा झाले, ज्या माता-भगिनींचे कुंकू पुसले गेले तेव्हा ही भूतदया, माणुसकी कुठे गेली होती,’ असा सवाल त्यांनी केला.‘पाकिस्तानविरोधात, दहशतवादाविरोधात भूमिका मांडण्यासाठी खासदार जगभर गेले. पण या शिष्टमंडळाला एकाही देशाने आपल्याबरोबर आहोत हे सांगितल्याचे स्पष्ट झालेले नाही.पाकिस्तानविरोधात बोलायला कोणीही तयार नाही..पण त्याच पाकिस्तानविरोधात आपण क्रिकेट खेळणार आहोत. याचा अर्थ आपल्या शिष्टमंडळाचे म्हणणे खोटे होते. आता पाकिस्तान चांगल्या गुणांचा पुतळा होता म्हणून त्याच्याशी क्रिकेट खेळत असल्याचे ऐकवणार का?,’ अशी टीका त्यांनी परराष्ट्र धोरणावर केली..‘मोदी चांगली हिंदी बोलतात’हिंदी सक्तीच्या विरोधाबाबत बोलताना मी दिल्लीत गेलो तेव्हाही आमचा हिंदीला विरोध नाही फक्त हिंदी सक्तीला विरोध असल्याचे स्पष्ट केल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आपल्यापेक्षा पंतप्रधान मोदी चांगली हिंदी बोलतात मग ते कोणत्या शाळेत शिकले?, त्यांनाही पहिलीपासून हिंदी सक्ती होती का?, मग तरीही त्यांना आश्वासने देण्यापुरती का होईना हिंदी येते ना,’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.