मामा-भाचे महाराष्ट्र काँग्रेसला तारणार?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. बाळासाहेबांचे भाचे सत्यजीत तांबे हे महाराष्ट्र युवक काँग्रेसते प्रदेशाध्यक्ष आहेत. एकूणच आता महाराष्ट्र काँग्रेसची संपूर्ण धुरा मामा-भाच्याच्या हाती आली आहे असे म्हणावे लागेल.

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. बाळासाहेबांचे भाचे सत्यजीत तांबे हे महाराष्ट्र युवक काँग्रेसते प्रदेशाध्यक्ष आहेत. एकूणच आता महाराष्ट्र काँग्रेसची संपूर्ण धुरा मामा-भाच्याच्या हाती आली आहे असे म्हणावे लागेल.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची चांगलीच वाताहत झाली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ एका जागेवर विजय मिळविता आला त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही राजीना दिल्यानंतर राज्यातील नेतृत्व बदललं. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

राज्यातील प्रदेशाध्यक्ष पदासाठी आणखी काही नेत्यांची नावही चर्चेत होती मात्र अखेर बाळासाहेब थोरात यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली. तसेच, त्यांचे भाचे सत्यजीत तांबे हे आधीपासूनच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. म्हणजेच एकूणच महाराष्ट्र काँग्रेसची धुरा बाळासाहेब थोरात आणि सत्यजीत तांबे या मामा-भाच्याच्या हातात आली असून ते महाराष्ट्र काँग्रेसला तारणार का? आगामी निवडणूकीत ही जोडी मरगळलेल्या काँग्रेस पक्षाला उभारी देणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Balasaheb Thorat and Satyajeet Tambe save Maharashtra Congress