रेल्वेने पश्‍चिम महाराष्ट्र-कोकणला जोडणार : सुरेश प्रभू

रेल्वेने पश्‍चिम महाराष्ट्र-कोकणला जोडणार : सुरेश प्रभू

कोल्हापूर : ""पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतमाल व औद्योगिक माल निर्यातीसाठी कोल्हापूर- कोकण रेल्वे जोडली जात आहे. यातून पश्‍चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार आहे, म्हणून ही प्रक्रिया लवकर पूर्ण करून घेण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे,'' असे ठोस आश्‍वासन केंद्रीय वाणिज्य व नागरी विमान उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे केले. कोल्हापूर-वैभववाडी आणि कराड-चिपळूण हे रेल्वेमार्ग मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील असून, तो यशस्वी करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी आज दिली. 

पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापन कार्यालयातर्फे कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर विश्रामगृह, पादचारी पुलाचे उद्‌घाटन व नव्याने होणाऱ्या प्लॅटफॉर्मचे बांधकाम व विस्तारीकरणाच्या कामांची पायाभरणी मंत्री प्रभू यांच्या हस्ते झाली. या वेळी ते बोलत होते. महापौर सरिता मोरे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार अमल महाडिक आदी उपस्थित होते. 

मंत्री प्रभू म्हणाले, ""रेल्वेसेवेत सर्वसामान्यांच्या हिताच्या सुखसुविधा असाव्यात, अशी सेवा देशभर देण्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 854 कोटींची आर्थिक तरतूद केली होती. त्यातून देशातील रेल्वे स्थानकावर सुधारणा होत आहेत.'' 

पूर्वी रेल्वेच्या सुविधांना मर्यादा होत्या. यामध्ये कॅन्टीन सुविधांपासून ते सामान वाहून नेण्याच्या तांत्रिक साधनापर्यंत अनेक गोष्टीची कमतरता होती. आता रेल्वेला आर्थिक निधी मिळाला. त्यातून पायाभूत सुविधा देण्यावर भर दिला म्हणून गेल्या सात वर्षांत देशातील सर्व ट्रॅकचे नूतनीकरणाचे काम झाल्याने रेल्वे अपघातांची संख्या घटली आहे, असे प्रभू म्हणाले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com