

NCP NDA News
ESakal
महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन राजकीय समीकरणे तयार होण्याबाबतच्या चर्चा पुन्हा एकदा तीव्र झाल्या आहेत. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होऊ शकतो, अशा चर्चा सुरू असतानाच पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटचे मानले जाणारे विनोद तावडे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.