शिवसेना तुमच्यासोबत राहणार का? - नवाब मलिक

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 जानेवारी 2019

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि समविचारी पक्षांची आघाडी निश्‍चित आहे, त्याची चिंता तुम्ही करू नका. आधी तुमच्यासोबत तुमचा सहकारी पक्ष शिवसेना राहतो का, ते आधी बघा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले.

चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला वेगवेगळे लढण्याचे आव्हान दिले आहे. त्याचा समाचार घेताना नवाब मलिक यांनी आधी स्वत:चे बघा, असा टोलाही लगावला. 

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात हिंमत असेल तर वेगवेगळी निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान चंद्रकांत पाटील हे आम्हाला देत आहेत; परंतु आमची आघाडी निश्‍चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि समविचारी पक्षांची आघाडी देशात व महाराष्ट्रात ठरलेली आहे आणि आम्ही एकत्रितच निवडणुका लढवणार आहोत, असेही मलिक यांनी सांगितले.

तुमचे सहकारी पक्ष तुमच्यासोबत निवडणुका लढवू इच्छित नाहीत किंवा यायला तयार नाही, त्या भीतीपोटी तुम्ही दुसऱ्या पक्षांना आव्हान देण्याचे काम करत आहात. आधी शिवसेना तुमच्यासोबत राहील का, याची चिंता तुम्ही करा. आम्ही एकसंघ राहणार आहोत, असेही मलिक यांनी या वेळी बोलताना 
स्पष्ट केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Shivsena live with you Nawab Malik