समुद्र कुटी प्रकल्पाबाबत महत्वाचा निर्णय! पर्यावरण विभागाचं मार्गदर्शन घेऊनच राबवणार प्रकल्प.. 

beach cottage
beach cottage

मुंबई: राज्य सरकारने राज्यातील 8 समुद्र किनाऱ्यावर समुद्र कुटी ( बीच शॅक्स) प्रकल्पास परवानगी दिली. यातील कोकणातील दिवेआगार व गुहागर किनाऱ्यावर कासवाची विण होते. तसेच अन्य ठिकाणी कासव विणीच्या हंगामात किनाऱ्यावर प्रजननासाठी येतात. या प्रकल्पामुळे कासवाच्या विणीला धोका निर्माण होण्याची शक्यता पर्यावरण प्रेमींकडून वर्तवण्यात आली. 

या बाबत पर्यटन विभाग हा प्रकल्प राबवताना पर्यावरण विभागाचे मार्गदर्शन आणि सल्लामसलत करून त्यांची अंमलबजावणी करेल. तसेच ज्या किनाऱ्यावर कासवाची विणीचे प्रमाण अधिक आहे तेथे समुद्र कुटीसाठी पर्यायी जागा उपलब्ध नसल्यास तो समुद्र किनारा वगळण्यात येईल. याबबात पर्यावरण विभागाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पर्यटन संचालनालयाचे संचालक दिलीप गावडे यांनी दिली.

एमटीडीसीच्या फेसबुक पेजवर समुद्र कुटी प्रकल्पाबाबत माहिती देण्यासाठी पर्यटन संचालनालयाचे संचालक दिलीप गावडे फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी अनेक पर्यावरण प्रेमींनी कोकणातील जैविविधता आणि कासव विणी काळ याबाबत गावडे यांना प्रश्न विचारले. समुद्र किनाऱ्यावरील जैवविविधता व कासव विणी यांना या प्रकल्पामुळे कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता घेऊनच प्रकल्प राबवला जाईल, अशी भूमिका दिलीप गावडे यांनी  स्पष्ट केली. 

गोवाप्रमाणे राज्यातील आठ समुद्र किनारी समुद्र कुटी उभारण्यात येत आहे. यासाठी 80 टक्के स्थानिकांना प्राधान्य देण्यात आले आहे. समुद्र किनाऱ्यावर जागा पर्यटन विभाग उपलब्ध करून देणार आहे. त्यावर समुद्र कुटीची उभारणी ही खाजगी गुंतवणूकदार गुंतवणूक करणार आहे. समुद्र कुटी पॉलिसीमध्ये शौचालय, शॉवर, लॉकर , चेजिंग रुम अशी कॉमन  फॅसिलिटी  सेंटर  असणार आहे. पंचक्रम, अन्न, शीतपेय, वाईन व बीयर, पोहण्यासाठी आवश्यक संसाधन, डेक बेड आणि अब्रेला अशा सुविधा असतील. ही सुविधा 1 सप्टेंबर पासून सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती दिलीप गावडे यांनी दिली. 

आगामी काळात समुद्र किनाऱ्याजवळील खाजगी जागावर समुद्री कुटी उभारण्यास परवानगी देण्याचे विचारधीन आहे, असे त्यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, आरेवारे ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली ; रायगड जिल्ह्यातील वर्सोली, दिवेआगार आणि पालघर जिल्ह्यातील केळवा व बोर्डी या 8 किनाऱ्यांवर बीच शॅक्स प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक कुटीमध्ये ठारविक अंतर असणार आहे. या कुटीचे बांधकाम पर्यावरपूरक वस्तंपासून असावे. 

उदाहरणार्थ  बांबूपासून बनवणाऱ्या भर देण्यात येईल. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 अशीच वेळ आहे. समुद्र स्वच्छतेबाबत समुद्री कुटीचे मालक, तेथील वेगवेगळ्या यंत्रणेची जबाबदारी असेल. समुद्र कुटी आणि कॉमन फॅसिलिटी सेंटर मध्ये हिरवे, लाल, निळे असे तिन्ही वेगवेगळ्या कचऱ्यापेटी ठेवण्यात येतील.

स्वच्छतेबाबत स्थानिकांकडून जनजागृती केली जाईल, असे गावडे यांनी सांगितले. समुद्र कुटीबाबत राज्य सरकारचा जीआर आल्यावर त्यासाठी अर्ज व अन्य माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. पर्यटकांसाठी एसी समुद्र कुटीचे प्रति पर्यटक  दीड हजार भाडे आहे तर नॉनएसची 750 रुपये प्रती पर्यटक भाडे आहे.

will take advice of environment department for samudra kuti project

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com