Will Vijay Wadettiwar Leave Congress
esakal
विजय वडेट्टीवार आमचे चांगले मित्र असून ते एकनाथ शिंदेंचेही चांगले मित्र आहेत.त्यांनी शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला तर सर्वात जास्त मला आनंद होईल, असं विधान मंत्री उदय सांमत यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर विजय वडेट्टीवार शिंदे गटात जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, याबाबत आता विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.