जानेवारीत होणार राज्याचं हिवाळी अधिवेशन | Winter session | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vidhan-bhavan

जानेवारीत होणार राज्याचं हिवाळी अधिवेशन

sakal_logo
By
रश्मी पुराणिक

मुंबई: हिवाळी अधिवेशन (Winter session) नवीन वर्षात म्हणजे जानेवारी 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुका (Mlc Election) आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local body election) दरम्यान हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात (January first week) हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणे अपेक्षित असल्याने हिवाळी अधिवेशन जानेवारीत होणार आहे.

विधान परीषदेच्या निवडणुका येत्या १० डिसेंबरला होत आहेत. त्यामुळे सर्व पक्षांनी हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन पुढे ढकललं जाणार आहे.

हेही वाचा: काशिफ खान वानखेडेंचा कलेक्टर आहे, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक झाल्यावर हिवाळी अधिवेशन मुंबई किंवा नागपूर कुठे आणि कधी घेणार हे अधिकृत जाहीर करण्यात येईल. सध्या सूत्रांच्या माहीती नुसार हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलल्याची माहीती आहे.

loading image
go to top