Winter Session : रश्मी शुक्ला क्लीनचीटवरून विरोधक आक्रमक! संतप्त अजित पवार म्हणाले, टॅपिंगचं...

Devendra Fadnavis and Ajit Pawar
Devendra Fadnavis and Ajit Pawar

नागपूर - हिवाळी अधिवेशन सुरू असून विरोधकांनी आज सकाळीच सभात्याग केल्याचं दिसून आलं. आज ११ वाजता प्रश्नोत्तराचा तास विधानसभेत होता. हा तास सुरू होण्यापूर्वी माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांच्या काळात वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंग प्रकरणाची चर्चा करण्याची मागणी केली. मात्र सत्ताधारी यावर तयार नसल्याने संतप्त विरोधकां सभात्याग केला.

Devendra Fadnavis and Ajit Pawar
Winter Session 2022 '५० खोके' संपले; आता 'दिल्लीचे मिंधे...'; विरोधकांची नवी घोषणा

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, रश्मी शुक्ला यांची चौकशी सुरू होती. नाना पटोले, एकनाथ खडसे, संजय काकडे आणि आशिष देशमुख यांचे नाव बदलून फोन टॅप करण्यात आले. या प्रकरणांच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल झाला होता. मात्र सरकार बदलल्यानंतर रश्मी शुक्ला यांची चौकशी थांबवली. तसेच त्यांना क्लिनचीट दिलं. मात्र कोर्टाने आक्षेप घेत चौकशी थांबवता येणार नसल्याचं म्हटलं. यावरून हे स्पष्ट होतं की, सरकार निव्वळ राजकीय भूमिकेतून काम करतं, असही अजित पवार म्हणाले.

हेही वाचा सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

Devendra Fadnavis and Ajit Pawar
Basavaraj Bommai : महाराष्ट्रातील विरोधीपक्षावरच भडकले बोम्माई; म्हणाले, मानसिक संतुलन...

महत्त्वाच्या पदावर बसल्यानंतर भेदभाव करून चालत नाही. विधानसभा सदस्यांच्या हक्कांचं संरक्षण करणं विधानसभा अध्यक्षांचं कर्तव्य आहे. त्यांच्याकडे ते अधिकारही आहे. मात्र त्यांनी सविस्तर बोलू दिलं नसल्याची खंत अजित पवार यांनी व्यक्त केली. दरम्यान आमचं ऐकून घेतलं जात नाही. माजी अध्यक्षांबद्दल तुम्ही अशा प्रकारची भूमिका घेत असेल तर सर्वसामान्यांचं ऐकणार कोण? त्यांना आधार कोण देणार असे प्रश्न उपस्थित करत अजित पवार यांनी विरोधकांनी सभात्याग केल्याचं म्हटलं. यावेळी अजित पवार यांनी जवळच्या लोकांना क्लीनचीट देण्याच्या सरकारच्या कृतीचा निषेध केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com