Winter Session : जयंत पाटलांचे एक वर्षासाठी निलंबन? नार्वेकरांच्या दालनात बैठक सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Jayant Patil and Rahul Narvekar

Winter Session : जयंत पाटलांचे एक वर्षासाठी निलंबन? नार्वेकरांच्या दालनात बैठक सुरू

नागपूर - नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सध्या चांगलच गाजत आहे. अधिवेशनात सध्या दिशा सालियन प्रकरण गाजत असून रश्मी शुक्ला यांच्यावरून राजकारण तापलं आहे. मात्र या सर्व घडामोडीत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना निलंबित करण्याची तयारी सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत असल्याचं समजतं. (Jayant Patil news in Marathi)

हेही वाचा: China BF.7 Variant : चीनचा व्हेरिएंट येतोय ; नागरिकांनो घाबरू नका; काय म्हणाले डॉ. रवी गोडसे

जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांविषयी अपशब्द वापरल्याचा दावा करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्षांना निर्लज्य म्हटल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात बैठक सुरू आहे. या बैठकीत पाटील यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पाटील यांच्या निलंबनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच आक्रमक दिसून आलं आहे.

हेही वाचा: Winter Session 2022 : माजी मंत्री बबनराव पाचपुतेंना श्वसनाचा त्रास; विधानभवनातून खासगी रुग्णालयात दाखल

सत्ताधाऱ्यांकडून आज दिशा सालियन प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी मान्य करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीची स्थापना केली. त्यानंतर सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. या गदारोळात जयंत पाटील यांनी निर्लज्य शब्दाचा उच्चार केल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान जयंत पाटील यांनी निर्लज्य शब्द विधानसभा अध्यक्षांना अनुसरूनच केल्याचं दावा करण्यात आला. त्यामुळे जयंत पाटील यांचं निलंबन होत का, असा प्रश्न उपस्थित होतोय.

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...