सरकार आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

दिल्ली अभी दूर है, मी राज्यात सरकार आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मुंबईत परळ येथे शिवसंग्राम प्रतिष्ठानचा कार्यक्रम झाला. या वेळी झालेल्या सभेत फडणवीस यांनी राज्यात भाजपचे सरकार आणण्याचा निर्धार केला. या वेळी त्यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला.

मुंबई - दिल्ली अभी दूर है, मी राज्यात सरकार आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मुंबईत परळ येथे शिवसंग्राम प्रतिष्ठानचा कार्यक्रम झाला. या वेळी झालेल्या सभेत फडणवीस यांनी राज्यात भाजपचे सरकार आणण्याचा निर्धार केला. या वेळी त्यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फडणवीस म्हणाले, ‘‘मी मैदान सोडून पळणाऱ्यांपैकी नाही. मी महाराष्ट्र सोडणार नाही, असे सांगत दिल्लीत जाणार नाही, हे स्पष्ट केले. आमचे सरकार पुन्हा आणणारच, असा निर्धार फडणवीस यांनी केला. जोपर्यंत महाराष्ट्रात सरकार येत नाही, तोपर्यंत जाणार नाही. सध्याचे सरकार हे राजकीय हाराकिरी करून आलेले सरकार आहे. आपले सरकार बहुमताने आलेले होते. उद्या भविष्यात मोठे यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.’’ 

लोकसभेसाठी उमेदवारी मागितली नव्हती : विश्‍वजीत कदम

तीनचाकी रिक्षाप्रमाणे हे सरकार आहे. रिक्षाची चाके एकाच दिशेने जातात; मात्र याची चाके तिन्ही बाजूला विरुद्ध दिशेने जात आहेत. हे फार काळ टिकणारे सरकार नाही. आम्ही कोणाचा विश्‍वासघात केलेला नाही. उलट आताचे ठाकरे सरकार हे विश्‍वासघातकी सरकार आहे, ते फार काळ टिकणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. आताच्या सरकारने एकच चांगले काम केले, ते म्हणजे आम्ही जे चांगले निर्णय घेतले होते आणि विकासकामांसाठी गती वाढवली होती, ते त्यांनी थांबवण्याचे काम केले. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही फसवी आहे. त्यामुळे काहीच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. तशा तक्रारी आल्या आहेत, असे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Without government it will not be healthy devendra fadnavis