मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न

संजय शिंदे
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

मंत्रालयात यापूर्वी अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न झाले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा येथे आत्महत्येचा प्रयत्न झाला. मंत्रालयाच्या दारातच एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. 

मुंबई : सावकारी कर्जाला कंटाळून एका महिलेने मंत्रालयाच्या गार्डन प्रवेद्वाराजवळ अंगावर रॉकेल ओतून आज दुपारी आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच या महिलेला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

शारदा अरूण कांबळे (वय-45) लाल डोंगर चेंबूर येथे राहणाऱ्या या महिलेवर सावकारी कर्ज आहे. त्याचा वाद न्यायालयात सुरू असून, या महिलेने आज दुपारी मंत्रालयाच्या गार्डन प्रवेद्वाराजवळ सोबत बाटलीत आणलेले रॉकेल अंगावर ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याचवेळेस मंत्रालयाच्या गार्डन प्रवेशद्वरावर सुरक्षेवर तैनात असलेल्या पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

दरम्यान, या महिलेला मरीन ड्राईव्ह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास मरीन ड्राईव्ह पोलिस करीत आहेत.

Web Title: A Woman Attempt to suicide in Mantralay Maharashtra