मंत्रालयाच्या दारात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

मुंबई - उस्मानाबाद येथून आलेल्या महिलेने मंत्रालयाच्या प्रवेशदारात आत्महत्येचा प्रयत्न केल्याने पोलिसांची धावपळ उडाली. प्रसंगावधान राखून पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. 

मुंबई सह राज्याच्या अन्य जिल्ह्यात मराठा आंदोलन सुरू असल्याने राज्य सरकारने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. राज्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. यापूर्वी मंत्रालयात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरात आज बंदोबस्त वाढवला आहे. 

सावकारी जाचाला कंटाळून अलका कारांडे या महिलेने बाटलीतील रॉकेल अंगावर ओतून घेतले. या वेळी प्रसंगावधान राखत पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले, मरीन लाइन्स पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. 

Web Title: woman's suicide attempt at the door of ministry