राज्य निवडणूक आयोगाची लगबग 

work start for State Election Commission
work start for State Election Commission

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबत भारतीय निवडणूक आयोगाची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाल्याचे सर्व विभागांना कळवण्याची लगबग निवडणूक आयोगाच्या राज्य कार्यालयात सुरू झाली आहे. 

राज्य सरकारच्या विविध विभागांना चोवीस तासांच्या आत आचारसंहिता लागू झाल्याचे कळवण्याची जबाबदारी या कार्यालयाची असून, यापुढील काळात निवडणूक आयोग वेळोवेळी या सर्व विभागांना मार्गदर्शन व सूचना करणार आहे. राज्यातील विभागीय आयुक्‍तांची कार्यालये, सर्व जिल्हाअधिकारी कार्यालये, पोलिस अधीक्षक कार्यालये तसेच राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालये यांना आचारसंहिता लागू झाल्याचे निवडणूक कार्यालयाकडून कळवण्यात येत आहे. 

आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत आणि मतदान पूर्व आणि मतदानानंतर केल्या जाणाऱ्या जनमत चाचण्यांचे अंदाज याबाबत वेळोवेळी निवडणूक आयोग कळवणार आहे. तसेच या दरम्यान क्षेत्रीय कार्यालयाने कोणती जबाबदारी पार पाडावी याच्या मार्गदर्शक सूचना निवडणूक आयोगाकडून दिल्या जाणार आहेत. आचारसंहिता लागू झालेली असताना निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सरकारच्या विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी यांची गरज निवडणूक आयोगाला भासत असते. त्यानुसार विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी यांचा सहभाग करून घेणे, त्यांना निवडणूक प्रक्रियेबाबतचे प्रशिक्षण देणे, त्यांना निवडणूक कामकाजात जुंपून घेणे याबाबत पुढील काळात निवडणूक आयोगाचे प्रशासन सक्रिय राहणार आहे. 

बॅनर, पुतळे झाकण्याची सूचना 
आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय पक्ष, राजकीय नेत्यांना त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर, त्यावरील प्रचारकी घोषणा काढून टाकण्याची, तसेच निवडणूक चिन्हांशी संबंधित असलेले पुतळ्यांवर आच्छादन घालून त्याची ओळख तात्पुरती बंदिस्त करणे, याबाबत सूचना प्रशासनाला दिल्या जातात. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर या सूचनांचे पालन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची आहे. त्यांना निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडून मार्गदर्शन केले जाते. या सर्व घडामोडीमुळे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पुढील काळात धावपळ राहणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com