परप्रांतीय कामगार राज्यात परत येत असून, आतापर्यंत....

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 20 June 2020

गृहविभागाकडून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व कामगारांची योग्य नोंद करण्यात येत आहे. तसेच, त्यांची थर्मल तपासणी करण्यात येत असून, त्यांना होम क्वारंटाइन करण्यात येत आहे.
- अनिल देशमुख, गृहमंत्री

मुंबई - लॉकडाउनच्या शिथिलीकरणानंतर आता राज्यात विविध उद्योगधंदे हळूहळू सुरू झाले आहेत. यासाठी परप्रांतीय कामगार राज्यात परत येत असून, गेल्या दोन दिवसांत रेल्वेद्वारे सुमारे दीड लाख मजूर राज्यात दाखल झाले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यात परत गेले होते. ते आता महाराष्ट्रात मोठ्या संख्येने परत येत आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, रायगडसह राज्याच्या इतर भागातही दररोज जवळपास साडेपंधरा हजार कामगार येत आहेत. गोंदिया, नंदुरबार, कोल्हापूर, नागपूर, पुणे या ठिकाणी सध्या साधारणतः ४ ते ५ हजार तर मुंबई ठाणे नवी मुंबई भागात ११ ते साडेअकरा हजार परप्रांतीय कामगार दररोज येत आहेत. सध्या ही संख्या कमी आहे; उद्योगधंदे, व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर या संख्येत वाढ होईल.

दहावी नंतर करिअर फक्त 'कसे निवडावे' नव्हेतर 'कसे घडवावे' यासाठी जॉईन करा सकाळ पेपर्स आणि दिशा अकॅडमी, वाई आयोजित वेबिनार

महाराष्ट्रातून परराज्यांत गेलेले मजूर
८२२ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे ११ लाख ८६ हजार २१२ 
एसटी बसने
एकूण बस : ४४,१०६
एकूण मजूर : ५,३७,५९३
पायी : अंदाजे ३ लाख

दोन दिवसांत सध्या रेल्वेने महाराष्ट्रात आलेले मजूर - १.५० लाख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: workers are returning to the maharashtra state after lockdown