डिसले गुरुजींबाबत नवा खुलासा, जागतिक बॅंकेच्या मेलमुळे संभ्रम|Ranjitsinh Disale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Bank on Ranjitsinh Disale

डिसले गुरुजींबाबत नवा खुलासा, जागतिक बॅंकेच्या मेलमुळे संभ्रम

मुंबई : ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींची (Gloabl Teacher Ranjitsinh Disale) जागतिक बँकेवर (World Bank) शिक्षण सल्लागार म्हणून नियुक्ती केल्याचं समोर आलं होतं. जून २०२१ ते जून २०२४ या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आल्याचं डिसले गुरुजींनी सांगितलं होतं. याबाबत एका व्यक्तीनं जागतिक बँकेकडे चौकशी केली असता वेगळीच माहिती समोर आली आहे. जागितक बँकेच्या मेलमुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

हेही वाचा: ग्लोबल टिचर डिसले गुरुजींना परत करावा लागणार 35 महिन्यांचा पगार

वैभव कोकाटे नावाच्या व्यक्तीनं जागतिक बँकेला इमेल करून रणजितसिंह डिसले गुरुजींच्या नियुक्तीबाबत चौकशी केली होती. त्यांना जागतिक बँकेकडून उत्तर मिळाले असून आमच्याकडे रणजितसिंह डिसलेंना जागितक बँकेवर सल्लागार म्हणून नियुक्त केल्याचा कुठलाही रेकॉर्ड नाही, असं जागितक बँकेनं केलेल्या इमेलमध्ये म्हटलं आहे. तसेच आणखी पडताळणी करण्यासाठी आम्हाला अधिक माहिती लागेल, असंही त्या इमेलमध्ये म्हटलं आहे. कोकाटे यांनी या इमेलचा स्क्रीनशॉट ट्विट करत रणजितसिंह डिसले गुरुजींना खुलासा करण्याचं आव्हान दिलं होतं.

डिसले गुरुजींनी दिलं उत्तर -

दरम्यान, रणजितसिंह डिसले गुरुजींनी ट्विटला रिप्लाय देत जागतिक बँकेकडून प्राप्त झालेले पत्र जोडले आहे. मला जागतिक बँकेकडून पत्र प्राप्त झाले आहे. पत्राची पडताळणी करण्यासाठी त्यांनी जागतिक बँकेची वेबसाईट देखील दिली आहे. तसेच पाठपुरावा करण्यासाठी वैभव कोकाटे यांचे आभार देखील मानले आहेत. पण, वैभव कोकाटे यांनी शेअर केलेला जागतिक बँकेचा इमेल आणि डिसले गुरुजींचे उत्तर यामुळे आता संभ्रम निर्माण झाला आहे.

डिसले गुरुजींची नियुक्ती कधी झाली? -

संपूर्ण जगातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी जागतिक बँकेने ग्लोबल कोच नावाचा उपक्रम सुरू केला आहे. जगभरातल्या मुलांना मिळत असलेल्या शैक्षणिक पातळीत वृद्धी करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमांची वेगवेगळी ध्येये गाठण्यासाठी जगातल्या 12 तज्ज्ञ व्यक्तींची सल्लागार म्हणून ३ जूनला निवड करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून 21व्या शतकातल्या शिक्षकांच्या घडणीसाठी या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे डिसले यांनी सांगितले होते.

Web Title: World Bank Email Says No Record Of Ranjitsinh Disale As Advisor

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :World Bank
go to top