

Nashik National Onion Bhavan
ESakal
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे यांनी आज नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात जगातील पहिले आणि सर्वात मोठे 'राष्ट्रीय कांदा भवन' बांधण्याची ऐतिहासिक घोषणा केली. राष्ट्रीय कांदा भवन सुरुवातीला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील जयगाव येथे दोन एकर जागेवर स्थापन केले जाईल.