मुली लवकर वयात येताहेत... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

मुंबई - बदलती जीवनशैली, फास्ट फूडची वाढती क्रेझ, इंटरनेटचा वाढता वापर आदी कारणांमुळे मुली लवकरच वयात येऊ लागल्या आहेत. या मुद्‌द्‌याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज स्त्रीरोड तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. दहा वर्षांच्या आत मुलींना मासिक पाळी येण्यास सुरुवात झाल्यास तिची हार्मोनल टेस्ट, सोनोग्राफी करून घ्यावी, असा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत. 

आठ वर्षांची मृण्मयी जोशी (नाव बदलेले आहे) काही दिवसांपूर्वी शाळेतून रडतच घरी आली. शाळेच्या गणवेशावर रक्ताचे डाग लागल्याने ती खूप घाबरली होती. घरी आल्या आल्या तिने रडवेल्या चेहऱ्याने आईला घट्ट मिठी मारली. आईने तिला विश्‍वासात घेतल्यानंतर तिने घाबरण्यामागील कारण सांगितले. त्यानंतर आईने तिची शारिरीक तपासणी केल्यानंतर मृण्मयीला मासिक पाळी आल्याचे समजले. एवढ्या लहान वयात आपल्या लेकीला मासिक पाळी आल्याबाबत तिला आश्‍चर्यच वाटले. त्यानंतर आईने मृण्मयीला विश्‍वासात घेत या नैसर्गिक चक्राबाबत माहिती दिली. मृण्मयीच्या वयाच्या अनेक मुलींनाही या स्थितीस सामोरे जावे लागत असल्याचे निरीक्षण स्त्रीरोग तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

साधारणतः वयाच्या दहा ते चौदा वर्षापर्यंत मुलींना मासिक पाळी येते. त्याआधी मासिक पाळी येणे योग्य नाही. मुली लवकर वयात येण्याच्या प्रकारास वैद्यकीय भाषेत "प्रिकोशिअस प्युबिरीटी' असे म्हणतात. मुलीला लवकर मासिक पाळी येण्यास सुरुवात झाल्यास पालकांनी दुर्लक्ष करू नये. मुलीच्या आवश्‍यक वैद्यकीय तपासण्या करून घ्याव्यात. 
- डॉ. रेखा डावर, रिलायन्स फाउंडेशन 

पूर्वी मुली बारा ते चौदा वर्षापर्यंत वयात येत. आता इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सर्व माहिती अजाण वयात उपलब्ध होते. त्यामुळे भावनिक समज वाढते. परिणामी मुली शारिरीक बदलांना लवकर होतात. 
- डॉ. अंजली तळवळकर, स्त्रीरोगतज्ज्ञ, कोहिनूर रुग्णालय 

Web Title: world Menstrual hygiene day story