
ज्येष्ठ साहित्यिक अनंत मनोहर यांचे पुण्यात निधन
बेळगाव : ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त प्राध्याक अनंत मनोहर (वय ९२) यांचे शनिवारी (ता. १७) रात्री पुणे येथे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. (writer-anant-manohar-died-belgaum-marathi-news-akb84)
अनंत मनोहर यांचे जवळपास ऐंशीहून अधिक ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यांनी कादंबरी, कथा, प्रवासवर्णने, ललितलेख, नभोनाट्य, प्रासंगिके, चरित्रे अशा विविध प्रकारांतून साहित्य निर्मिती केली. त्यांनी १९६२ ते १९८८ या दरम्यान त्यांनी आरपीडी महाविद्यालयात मराठी विभागामध्ये सेवा बजावली. त्यांनी नुकताच बेळगावातून आपला मुक्काम चिरंजीव विनय यांच्याकडे पुण्याला हलवला होता. पण तिथे गेल्यावरही त्यांचे लेखन वाचन आणि बेळगावाशी असणारे ऋणानुबंध कायम होते.
हेही वाचा: भारीच ! कोल्हापूर जिल्ह्यातील वारकऱ्यांची पंढरीत होणार मोफत सोय
त्यांच्या निधनाच्या आदल्याच दिवशी म्हणजेच शनिवारी (ता.१७) त्यांचे चिरंजीव विनय मनोहर यांनी त्यांचा संदेश व्हिडीओद्वारे सर्वांना पाठविला. आपल्या लेखनासाठी पहिला ‘धनादेश' सकाळ या वृतपत्राने दिला होता. त्यावेळी मला अतिशय आनंद झाला होता. आता आपण लेखक व्हायला लागलो असे त्यावेळी वाटले, असे ते आवर्जुन नमूद करीत.
Web Title: Writer Anant Manohar Died Belgaum Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..