या या आमच्या बोकांडी बसा...; कोण आहे व्हायरल गाण्याचा जनक (व्हिडिओ)

Ya ya Amchya bokandi basa song Viral in Social media
Ya ya Amchya bokandi basa song Viral in Social media

सोलापूर : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येईना बुवा! गेल्या महिन्यात विधानसभा निवडणूक झाली. तेव्हा भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी 'मी पुन्हा येईन'चा नारा दिला होता. मात्र, त्यावर नेटिझन्सनी त्यांना चांगलेच ट्रोल केल्याचे आपण पाहिले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथही घेतली. त्यावर "मी पुन्हा आलो'ची घोषणा केल्याचेही आपण पाहिले. त्यावरून आता "या या आमच्या बोकांडी बसा...' या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मात्र, या गाण्याचा राजकीय घडामोडींशी संबंध नसल्याचे या गाण्याचे गायक साजन बेंद्रे यांनी सांगितले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

2019 च्या विधानसभा निवडणुकीतील सरकार स्थापनेचा पेच दिवसेंदिवस वाढतच आहे. एक महिना होऊनही राज्यात स्थिर सरकार स्थापन झालेले नाही. त्यामुळे नेटकरीही सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत. भाजप, शिवसेना यांच्यासह मित्रपक्षांनी एकत्र येऊन महायुतीने तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह इतर पक्ष एकत्र येऊन महाआघाडीने निवडणूक रिंगणात उतरले होते. प्रचारादरम्यान फडणवीस यांनी "मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन...' असा नारा देत मतदारांना विश्‍वास दिला होता. मात्र, यावर त्यांना नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले होते. त्यावर इंदोरीकर महाराज यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात "या या या बसा आमच्या बोकांडी बसा...' असं म्हटलं होतं. त्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात "... मी पुन्हा मारीन' असं त्यांनी म्हटलं होतं. 

 

एक महिन्यापासून राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. त्यात सोशल मीडियावरही अनेक विनोद फिरत आहेत. आता "या या या आमच्या बोकांडी बसा..!' या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. इचलकरंजी (कोल्हापूर) येथील बेंद्रे यांनी हे गाणं गायलं आहे. मात्र, या गाण्याचा राजकारणाशी काही संबंध नसल्याचे सांगत ते म्हणाले, "चिरघोडी' हा आपल्याकडील पारंपरिक खेळ आहे. राजकीय विषयात हे वाक्‍य आता आलेले आहे. पूर्वी या खेळाला "चला बोकांडी बसून खेळूया' असंही म्हटलं जात होतं, असं ते म्हणाले. हे गाणं पारंपरिक असलं तरी सध्याच्या राजकीय परिस्थितीला मिळतंजुळतं असल्याने चांगलंच चर्चेत आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com