esakal | इंद्रदेव चंद्रगुप्तला म्हणाले, पृथ्वीवर मोदींचं भाषण सुरुय; यशोमती ठाकुरांनी सांगितला 'किस्सा'
sakal

बोलून बातमी शोधा

Yashomati Thakur

आपल्या भाषणादरम्यान यशोमती ठाकूर यांनी नरेंद्र मोदी यांच्या खोटारडेपणाचा दाखला देताना एक गोष्ट सांगितली.

इंद्रदेव चंद्रगुप्तला म्हणाले, पृथ्वीवर मोदींचं भाषण सुरुय

sakal_logo
By
रुपेश कदम

दहिवडी (सातारा) : 'व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाएं संविधान'चा नारा देत काँग्रेसने (Congress Party) काढलेल्या स्मरण यात्रेदरम्यान वडूज येथे आयोजित कार्यक्रमात महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Minister Yashomati Thakur) यांनी आपल्या जोशपूर्ण भाषणाने सभा गाजवली. पण, त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) सडकून टीका करताना सांगितलेल्या गोष्टीने सभेला खळखळून हसविले.

यशोमती ठाकूर यांनी हिंदी, मराठी भाषेत भाषण करताना समोरील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 'हमने देश बनाया हैं', 'भारत माता की जय'च्या जोरदार घोषणा देण्यास कार्यकर्त्यांना सांगितले. तसेच 'पंधरा लाख मिळाले का?', पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव कमी झाले का? असे प्रश्नही उपस्थित केले. भाजपला चले जाव नव्हे, तर छोड दो सरकारचा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा: टेंडरसाठी राष्ट्रवादीत आलेल्यांना परळीत थारा नाही

आपल्या भाषणादरम्यान यशोमती ठाकूर यांनी नरेंद्र मोदी यांच्या खोटारडेपणाचा दाखला देताना एक गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या, एकदा इंद्रदेवांनी चंद्रगुप्तांना सांगितले की, आपण अशी एक यंत्रणा तयार करु की, पृथ्वीतलावर कोणी खोटे बोलले तर ते लगेच आपल्याला समजेल. इंद्रदेवाचा आदेश येताच चंद्रगुप्त तयारीला लागले. त्यांनी इंद्रदेवाच्या दरबारात एक घंटी बसवली. पृथ्वीतलावर कोणी खोटे बोलले तर ती घंटी वाजेल, असे नियोजन केले.

हेही वाचा: मठावरील 'ते' किस्से आम्हाला जनतेपुढे सांगावे लागतील

पहिल्या दिवशी चार-पाच वेळा घंटी वाजली. दुसर्‍या दिवशी आठ-दहा वेळा घंटी वाजली. काही दिवसानंतर घंटी वाजली अन् ती काही बंद व्हायचं नावच घेईना. घंटी सतत वाजतेय हे बघून इंद्रदेव चंद्रगुप्ताला म्हणाले, अरे चंद्रगुप्त आपली योजना बिघडलीय का? ही घंटी बंद का होत नाही? तर चंद्रगुप्त म्हणाले, इंद्रदेव महाराज आपली योजना व्यवस्थित सुरु आहे. पृथ्वीतलावर नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरु आहे म्हणून घंटी बंद होत नाही. नरेंद्र मोदींवर खोटारडेपणाचा आरोप करताना यशोमती ठाकूर यांनी सांगितलेल्या या गोष्टीने उपस्थितांना खळखळून हसविले.

loading image
go to top