महाराष्ट्र घडविण्यात मोहिते यांचे याेगदान - पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

चारित्र्य संपन्न राजकारण्यांमध्ये यशवंतराव मोहिते यांचे नाव अव्वलस्थानी आहे. सामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून काम करताना त्यांनी तत्त्वाशी व विचारांशी तडजोड केली नाही.
- प्रतिभा पाटील, माजी राष्ट्रपती

रेठरे बुद्रुक - राज्यात सत्ता हवी, असा विषय त्यांच्यासाठी कधीही महत्त्वाचा नव्हता. मात्र महाराष्ट्र घडला पाहिजे, असे विचार घेऊन ज्या काही लोकांनी महाराष्ट्रासाठी योगदान दिले, त्या विचारमालेतील यशवंतराव मोहिते यांचे नाव अव्वल स्थानावर आहे. त्याची माहिती युवा पिढीसमोर येण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यगौरव समारंभात ते बोलत होते. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते. या वेळी यशवंतराव मोहिते यांच्यावरील तीन पुस्तकांचे प्रकाशन झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yashwantrao Mohite contribution to the creation of Maharashtra sharad pawar