वैद्यकीय विद्यार्थी डॉक्टरची हत्या; गुन्हा दाखल करण्याची मागणी | Doctor Murder Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

वैद्यकीय विद्यार्थी डॉक्टरची हत्या; गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई :  बुधवारी यवतमाळ (yavatmal) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (government medical college) विद्यार्थी डॉ. अशोक पाल यांची हत्या (dr Ashok pal murder) करण्यात आली. ही हत्या महाविद्यालय परिसरातच झाली असून यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेतील गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करुन गुन्हा दाखल (Police FIR demand) करण्याची मागणी (doctors demand) निवासी डॉक्टरांच्या मध्यवती मार्ड संघटनेकडून करण्यात आली आहे. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे.

हेही वाचा: कंगणा राणावत विरोधात तक्रार; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

दरम्यान डॉ. अशोक पाल हे 2017 बॅचचे विद्यार्थी असून एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला होते. बुधवारी 10 नाव्हेंबर रोजी रात्री 8 ते 8.30 च्या दरम्यान त्यांचा मृतदेह महाविद्यालय परिसरात आढळून आला. याचा निषेध म्हणून यवतमाळ महाविद्यालयातील सर्व एमबीबीएस विद्यार्थ्यांनी संप पुकारला आहे. या संपाची तीव्रता वाढल्याने महाविद्यायाचे प्रवेशव्दार बंद करण्यात आले होते.

या विद्यार्थ्यांनी यवतमाळ वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याप्रमाणे यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एम. बी. कांबळे यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्तालयाकडे राजीनामा दिला आहे. दरम्यान, मध्यवर्ती मार्ड संघटनेकडून आणि निवासी डॉक्टरांकडून डॉ. अशोक पाल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

loading image
go to top