मोठी बातमी! यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द; समन्वय समितीने घेतला महत्वपुर्ण निर्णय

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 25 June 2020

  • यंदा दहीहंडी उत्सव रद्द
  • दहीहंडी समनव्य समितीच्या बैठकीत झाला निर्णय 

मुंबई: , कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती विचार करता यंदा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय दहीहंडी उत्सव समनव्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मंडळांची आर्थिक बाजू, आयोजक, सामाजिक अंतर या समीकरणाचा विचार करता दुस-या दिवशीचा गोपाळकाला हा उत्सव अर्थातच होणार नाही आणि तो साजरा केला जाऊ नये. अशी विनंती दहीहंडी उत्सव समन्वय समितीने महाराष्ट्रातील प्रत्येक गोविंदापटूला, प्रत्येक दहिहंडी पथकाला  केली. बुधवारी रात्री उशिराने ही बैठक पार पाडली. त्यावेळी समन्वय समितीच्या सर्व पदाधिकर्यांनी हा निर्णय एकमताने घेतला. या बैठकीत काही ठराव करण्यात आले.

मुंबई परिसरातील बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या दहा वर्षाचा इतिहास पाहिला तर दहिहंडी ही दरवर्षी कुठल्या ना कुठल्या संकटात सापडतेच मग ते संकट निसर्गनिर्मित असो की मानवनिर्मित, सामाजिक असो की राजकीय ते या सणाच्या पाचवीला पुजलेले अाहेच असे आढळून येईल. परंतु महाराष्ट्राच्या तरुणाईचा आणि आबालवृध्दांचा, मुली-महिलांचा आवडता, रांगडा सण नेहमीच त्या अडचणींवर मात करुन बाहेर पडलेला आहे. आपण सगळ्यांनी मिळून तो बाहेर काढलेला आहे हे ही तितकेच सर्वश्रुत सत्य आहे. 2020 च्या या कोरोना संकटाने, या महामारीनेमात्र दहिहंडीला सामाजिक बांधिलकीच्या, वैयक्तिक स्वास्थाच्या, आर्थिक बाबींच्या यक्ष प्रश्नाच्या तोंडी दिले आहे. यावर्षीचा प्रत्येक सण तसा रद्दच झालेला आहे.

महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून संजय कुमार यांची नियुक्ती...

कोरोनामुळे प्रत्येकाची वैयक्तिक, राज्याची, पर्यायाने देशाची स्वास्थ्यसुरक्षा ही टांगणीला लागलेली आहे. मृत्यु आणि जगणं यामधली रेष फारच पुसट झाली आहे. सामाजिक अंतर हा एकमेव पर्याय आपणापुढे असताना दहिहंडी खेळ आपण खेळणार तरी कसे ? सरकारने तर तसा आदेशच दिलेला आहे जो प्रत्येकाच्या भल्याचाच आहे. कोणतीही लस आणि ठोस औषध उपाय नसताना आपण एकत्र येण्याची जबाबदारी घेणार तरी कसे.?  या अशा एक ना अनेक प्रश्नांचा सारासार विचार करुन समितीने असा निर्णय घेतला आहे की यावर्षी "श्रीकृष्णजन्म" (अष्टमी) हा अत्यंत साध्या पध्दतीने ( अर्थातच , सामाजिक अंतराचे भान ठेऊनच ) साजरा करायचा. विभागीय पोलीस अधिकारी त्याबद्दल सूचना करतीलच परंतु आपणच आपल्यावर ते बंधन घालून घेऊ जेणेकरुन पोलीस बांधवांवरचा  त्याविषयीचा ताण थोडा कमी होईल. दुसऱ्या दिवशीचा गोपाळकाला सण रद्द करायचा निर्णय घेण्यात आला.वरील निर्णय हा यावर्षीसाठी ठाम आहे. यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असे दहीहंडी उत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी सांगीतले.

कोरोनात आकस्मिक मृत्यू टाळण्यासाठी डॉक्टरांकडून वापरला जातोय 'हा' महत्त्वाचा पर्याय...

"सर सलामत तो पगडी पचास" किंवा बचेंगे तो औरभी लडेंगे /खेलेंगे या म्हणींचा आधार घेत हा उत्सव पुढीलवर्षी जोमाने आणि जल्लोषात साजरा करण्यात येईल, असा निर्धार समन्वय समितीने बैठकीत केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This year's Dahihand festival canceled; Important decisions taken by the Coordinating Committee