‘यिन’ निवडणुकीसाठी अर्जप्रक्रिया सुरू | YIN Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

YIN
‘यिन’ निवडणुकीसाठी अर्जप्रक्रिया सुरू

‘यिन’ निवडणुकीसाठी अर्जप्रक्रिया सुरू

पुणे - राज्यातील युवक-युवतींचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या सकाळ ‘यंग इन्‍स्‍पिरेटर्स नेटवर्क’ अर्थात ‘यिन’च्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. ३० नोव्‍हेंबर रोजी मतदान होत असून, त्‍याच्‍या तयारीला आता वेग आला आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया व मतदान ॲपवरून ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

महाविद्यालयीन युवक-युवतींमधील नेतृत्‍वगुण विकसित व्‍हावे, त्‍यांच्‍यातील नेतृत्‍वक्षमतेला वाव मिळावा, यासाठी ‘यिन’च्‍या माध्‍यमातून निवडणूक घेण्‍यात येते आहे.

निवडणूक कार्यक्रम

  • अर्ज दाखल करणे : २२ नोव्‍हेंबरपर्यंत

  • उमेदवारांची यादी जाहीर करणे : २३ नोव्‍हेंबर

  • प्रचार कालावधी (ऑनलाइन) : २३ ते २८ नोव्‍हेंबर

  • मतदान : ३० नोव्‍हेंबर

  • निवडणुकीचा निकाल : २ डिसेंबर

  • अधिक माहितीसाठी : अनुजा पाटील - पुणे शहर यिन अधिकारी ७०३८०७४४१५

हेही वाचा: उद्याच्या रोजगारसंधी देणाऱ्या शिक्षण पध्दतीची गरज; डॉ. रघुनाथ माशेलकर

असा भरा उमेदवारी अर्ज

अर्ज भरण्‍यासाठी गुगल प्‍ले स्‍टोअरमधून ‘सकाळ माध्‍यम समूहा’चे Young Inspirators Network हे ॲप डाउनलोड करा.

युवकांमध्‍ये असणाऱ्या नेतृत्वगुणाला चालना देणारे ‘यिन’ हे सर्वांत प्रभावी माध्‍यम आहे. या माध्‍यमामुळे अनेक युवक आपापल्‍या भागाचे नेतृत्‍व करण्‍यासाठी पुढे येत आहेत. या युवकांना राज्‍यस्‍तरावर काम करण्‍यासाठीची संधी ‘यिन’ने निवडणुकीच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध करून दिली असून, त्‍यात सर्वांनी सहभागी होणे आवश्‍‍यक आहे.

- निनाद काळे, ‘यिन’ मेंटॉर

निवडणुकीच्या निमित्ताने लोकशाहीचे मूल्य व नेतृत्व कौशल्य रुजविण्यासाठी यिन सातत्याने काम करत आहे. यिनमधून लाखो मुले घडली आहेत. तुम्हासही घडण्याची हीच संधी आहे. त्यामुळे निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज भरून स्वतःसाठी व इतरांसाठी नेतृत्व निर्माण करूया.

- अॅड. श्‍वेता यशवंत भोसले, यिन, निवडणूक अधिकारी

loading image
go to top