योगींनी निर्णय घेतला फडणवीस मागे का? 

पीटीआय
बुधवार, 5 एप्रिल 2017

मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेला पीक कर्जमाफीचा निर्णय धाडसी असून, मी त्यांचे कौतुक करतो. योगींचा कित्ता गिरवत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्रात कर्जमाफी करत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकाद्वारे केली आहे. 

आदित्यनाथ यांनी कर्जमाफी करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान दिलेले आश्‍वासन त्यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत पूर्ण केले. घोषणा म्हणजे निवडणुकीपुरते जुमले नाहीत, हे योगींनी दाखवून दिले आहे. उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यामध्ये कर्जमाफी होऊ शकते; मग महाराष्ट्रासारखे कृषिप्रधान राज्य मागे का आहे, असा प्रश्‍नही उद्धव ठाकरे यांनी या वेळी उपस्थित केला. महाराष्ट्रात शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत. नापिकी, अवकाळी पाऊस, गारपीट या नैसर्गिक संकटांबरोबरच कर्जबाजारीपणा देखील याला कारणीभूत आहे. कर्जांचा भार हा शेतकऱ्यांना पेलवणारा नसल्याने त्यांचा सातबारा कोरा करा, ही शिवसेनेची मागणी आहे आणि भविष्यातदेखील ती कायम राहील, असे ठाकरे यांनी नमूद केले. 

Web Title: Yogi has already decided