तरुण उमेदवार मैदानात, ज्येष्ठ नेते प्रचारात! पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह शरद पवार, उद्धव ठाकरे ‘या’ प्रमुख १८ नेत्यांचे वय किती? वाचा...

निवडणूक म्हटली की आपल्या नेत्याच्या विजयासाठी तरुण कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून प्रचार करत मतदारसंघात दिवसरात्र फिरतात. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत सोलापूर व माढा या दोन्ही मतदारसंघात अशी स्थिती पाहायला मिळाली. तरुणांच्या बळावर अनेकांना विधानसभेत जाण्याची संधी मिळाली तर अनेकजण लोकसभेत देखील पोचले.
Sharad Pawar, Narendra Modi and Amit Shah
Sharad Pawar, Narendra Modi and Amit Shahloksabha election

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार राम सातपुते निवडणूक लढवत आहेत. या तरुण उमेदवाराच्या प्रचाराची प्रमुख जबाबदारी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे आहे. तर काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराची धुरा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या खांद्यावर आहे. माढा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचाराची धुरा आता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते- पाटील यांना सांभाळावी लागणार आहे. त्यामुळे तरुण उमेदवार लोकसभेच्या मैदानात तर ज्येष्ठ नेते प्रचाराच्या रणांगणात, असे एकूण चित्र सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाले आहे.

निवडणूक म्हटली की आपल्या नेत्याच्या विजयासाठी तरुण कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून प्रचार करत मतदारसंघात दिवसरात्र फिरतात. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत सोलापूर व माढा या दोन्ही मतदारसंघात अशी स्थिती पाहायला मिळाली. तरुणांच्या बळावर अनेकांना विधानसभेत जाण्याची संधी मिळाली तर अनेकजण लोकसभेत देखील पोचले. अनेक तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला प्रचाराच्या रणधुमाळीत गावोगावी फिरता येणार नाही, हे ओळखून त्यांच्या परस्पर काही गावांमध्ये स्वत:च प्रचारसभा घेतल्या आणि तेथून मताधिक्य देखील मिळवून दिले. पण, आता यंदाच्या निवडणुकीतील चित्र वेगळे असून सोलापूर मतदारसंघात आमदार राम सातपुते व आमदार प्रणिती शिंदे आणि माढा मतदारसंघात धैर्यशील मोहिते-पाटील हे तिन्ही उमेदवार तरुण आहेत. त्यांच्या प्रचारासाठी पक्षातील व कुटुंबातील ज्येष्ठ नेते फिरत आहेत, कार्यकर्त्यांशी संपर्क साधत असल्याची स्थिती आहे.

१४ दिवसांच्या कालावधीत दिग्गजांना आमंत्रण

भाजप महायुतीकडून माढा व सोलापूर या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार या प्रमुख नेत्यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आमंत्रण दिले आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तेलंगणचे मुख्यमंत्री रवंथ रेड्डी, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार संजय राऊत या देशपातळीवरील स्टार प्रचारकांना सभेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

प्रचारातील नेते अन्‌ त्यांचे वय

  • शरद पवार : ८३ वर्षे

  • सुशीलकुमार शिंदे : ८२ वर्षे

  • विजयसिंह मोहिते-पाटील : ७९ वर्षे

  • रामराजे निंबाळकर : ७६ वर्षे

  • नरेंद्र मोदी : ७३ वर्षे

  • बबनराव शिंदे : ७२ वर्षे

  • शहाजी पाटील : ६८ वर्षे

  • विजयकुमार देशमुख : ६७ वर्षे

  • सुभाष देशमुख : ६७ वर्षे

  • उद्धव ठाकरे : ६३ वर्षे

  • सिद्धाराम म्हेत्रे : ६३ वर्षे

  • संजय राऊत : ६२ वर्षे

  • दीपक साळुंखे-पाटील : ६१ वर्षे

  • अमित शहा : ५९ वर्ष

  • नारायण पाटील : ५८ वर्षे

  • देवेंद्र फडणवीस : ५४ वर्ष

  • धनंजय महाडिक : ५२ वर्षे

  • संजय शिंदे : ५५ वर्षे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com