तरुणांनो, शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम राहायचंय का? दररोज ४५ मिनिटे फास्ट चाला अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

योगा
तरुणांनो, शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम राहायचंय का? दररोज ४५ मिनिटे फास्ट चाला अन्...

तरुणांनो, शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम राहायचंय का? दररोज ४५ मिनिटे फास्ट चाला अन्...

सोलापूर : सध्या पोलिस भरतीसाठी अर्ज करायला सुरवात झाली असून राज्यभरात जवळपास साडेचौदा हजार पदांची भरती होणार आहे. सुरवातीला मैदानी आणि शेवटी लेखी चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीत यशस्वी होण्यासाठी तरूण-तरुणींची मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती खूप गरजेची आहे. त्यासाठी वेळेत व पुरेसी झोप, आहार, व्यायाम खूप महत्त्वाचा असणार आहे.

पोलिस शिपाई भरतीसाठी अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी व मराठी व्याकरण या चार घटकांवर १०० गुणांची परीक्षा होईल. वस्तुनिष्ठ प्रश्न असतील आणि त्यासाठी ९० मिनिटांचा (दीड तास) वेळ असणार आहे. चालक पोलिस शिपायांसाठी वाहतूक संदर्भात एक विषय जास्त असणार आहे. लेखी परीक्षा सर्वांची एकाच दिवशी होणार आहे. शारीरिक चाचणी पहिल्यांदा होणार असून त्यात १०० मीटर आणि १६०० मीटर धावणे आणि गोळाफेक असे प्रकार आहेत. महिला उमेदवारांसाठी सोळाशेऐवजी आठशे मीटर धावणे असा बदल असणार आहे. किमान ४० टक्के गुण बंधनकारक आहेत. एका पदासाठी दहा उमेदवारांची मेरिटनुसार लेखी चाचणीसाठी निवड केली जाणार आहे. त्याची तयारी करताना बारकावे ध्यानात घ्यावे लागणार आहेत.

ठळक बाबी...

- उमेदवारास ज्या जिल्ह्यात किंवा शहरात भरतीसाठी उभारायचे आहे, त्या ठिकाणाची निवड उमेदवार करू शकतो.

- पोलिस भरतीसाठी police recruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर करा अर्ज

- अर्ज करण्याची ३० नोव्हेंबर शेवटची मुदत; खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा १८ ते २८ तर मागास प्रवर्गासाठी १८ ते ३३ वयोमर्यादा

- महिलांसाठी उंची १५५ से.मी. आणि पुरुषांसाठी १६५ से.मी. आवश्यक; छाती न फुगवता ७९ से.मी. आणि फुगवून पाच से.मी. वाढावी

- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क ४५० रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५० रुपये आहे.

(शरीरिक तंदुरुस्तीची अशी घ्या काळजी)

१) दीड-दोन तासांनी पाणी प्यावे; शरीरातील पाणी कमी होऊ देवू नका

२) सूर्योदयापूर्वी किमान ४५ मिनिटे अगोदर उठावे; रात्री अकरापूर्वी झोपावे

३) दररोज किमान ४५ मिनिटे चालावे; शरीरातून घाम निघेपर्यंत टार्गेट ठेवून चाला

४) किमान सहा ते आठ तासांची झोप घ्या; रात्रीचे जेवण सात ते आठपूर्वी करा

५) जेवणात कडधान्य, पनीर, दूध, अंडी, मटण सूप, ड्रायफुड, हिरवा भाजीपाला असावा

(मानसिक स्वास्थासाठी ‘हे’ कराच)

१) सकाळी उठल्यावर काहीवेळ सूर्यनमस्कार करा

२) प्रणायाम व ध्यान केल्यास निश्चितपणे मनःशांती मिळेल

३) दीर्घ श्वास घेत घेत योगा केल्यास मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहील

४) रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी लिंबू, आवळा, संत्री, मोसंबी खा

५) मनात कशाचेही दडपण ठेवू नका; कायम आनंदी राहा