ई-मेलद्वारे उत्तर देण्याची झाकीर नाईकची तयारी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

मुंबई - वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक याने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) ई-मेलद्वारे उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. याप्रकरणी त्याने "ईडी'ला पत्र पाठवून प्रश्‍नावली पाठवण्याची मागणी केली आहे. यापूर्वी झाकीरने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्तरे देण्यास तयार असल्यास सांगितले होते. मात्र, "ईडी'ने त्यास नकार दिला होता. 

तब्बल 200 कोटींच्या कथित काळ्या पैशांप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी "ईडी'ने अनेक वेळा समन्स पाठवूनही झाकीर चौकशीसाठी उपस्थित राहिला नाही. त्याने ई-मेलद्वारे "ईडी'च्या प्रश्‍नांची उत्तरे देण्यास तयारी दाखवली आहे. याबाबत त्याच्या वकिलांमार्फत शुक्रवारी (ता. 24) एक पत्र "ईडी'ला पाठवण्यात आले आहे. यात झाकीरने त्याला प्रश्‍नावली पाठवण्यास सांगितले आहे. त्याची उत्तरे तो ई-मेलद्वारे देणार असल्याचे म्हटले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. हे पत्र झाकीरने वकिलांमार्फत "ईडी'ला पाठवले असून, त्यात त्याचा ई-मेल आयडी आहे. 

यापूर्वी त्याने व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली होती. त्यास "ईडी'ने नकार दिला होता. "ईडी'ने त्याची बहीण नायला नुरानी हिलाही समन्स पाठवून चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यामुळे आठवड्याभरात ती चौकशीला उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी आतापर्यंत "ईडी'ने झाकीरचा विश्‍वासू आमीर गाझदारला अटक केली होती. त्याला झाकीरच्या आर्थिक व्यवहारांबाबत माहीत असल्याचा "ईडी'ला संशय आहे. 

Web Title: Zakir Naik has agreed to give an answer by e-mail