Zika Virus : पालघरमध्ये सात वर्षीय मुलीला झिका विषाणूची लागण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Zika

Zika Virus : पालघरमध्ये सात वर्षीय मुलीला झिका विषाणूची लागण

मुंबई : महाराष्ट्रातील पालघरमध्ये (Palghar) सात वर्षांच्या मुलीला झिका विषाणूची (Zika Virus) लागण झाल्याचे आढळून आले आहे. लागण झालेली मुलगी ही पालघर जिल्ह्यातील झाई येथील आश्रमशाळेतील रहिवासी आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. याआधी 2021 मध्ये पुण्यात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला होता. (Zika Virus News In Marathi)

आरोग्य विभागाने सांगितले की, झाई येथील आश्रमशाळेत 7 वर्षांच्या मुलीला झिका विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. यापूर्वी जुलै 2021 मध्ये पुण्यात पहिला रुग्ण आढळून आला होता. दरम्यान, लागण झालेल्या मुलीवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करण्यात आले आहेत.

झिका व्हायरसची लक्षणे काय?

ताप, सांधे दुखी, डोकेदुखी, त्वचेवर पुरळ, स्नायू दुखणे, उलट्या आदी झिका विषाणूची लक्षणे असून, अशा प्रकारची लक्षणे आढळून आल्यास त्वरीत आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्यात डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो हे आपल्या प्रत्येकालाच माहिती आहे. झिका विषाणूदेखील डासांमुळे पसरणारा धोकादायक आजार आहे. हा संसर्ग डास चावल्यामुळे पसरतो. एडिस डास चावल्यामुळे या आजाराचा प्रसार होतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. (Symptoms Of Zika Virus )