जिल्हा परिषद करणार ५८१ शिक्षकांची भरती! मागासवर्गीय कक्षाकडून सुरु झाली बिंदुनामावली पडताळणी

जिल्हा परिषदेच्या शाळांना ५८१ शिक्षक मिळणार आहेत. बिंदुनामावली अंतिम करून मागासवर्गीय कक्षाकडे मान्यतेसाठी पाठविली आहे. त्यानंतर पदभरतीला प्रारंभ होणार असून बिंदुनामावलीनुसार अनुसूचित जाती-जमाती, भज-ब आणि खुला, अशा चार प्रवर्गातील तेवढी पदे सध्या रिक्त आहेत.
schools
schoolssakal

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शाळांना ५८१ शिक्षक मिळणार आहेत. जिल्हा परिषदेकडून बिंदुनामावली अंतिम करून मागासवर्गीय कक्षाकडे मान्यतेसाठी पाठविली आहे. त्यानंतर पदभरतीला प्रारंभ होणार असून बिंदुनामावलीनुसार अनुसूचित जाती-जमाती, भज-ब आणि खुला, अशा चार प्रवर्गातील तेवढी पदे सध्या रिक्त आहेत.

राज्यातील शालेय शिक्षण विभागाकडून जवळपास ३० हजार शिक्षकांची भरती केली जाणार असून सध्या ‘पवित्र’ पोर्टलवर उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. सर्व जिल्हा परिषदांनी प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत शाळांवरील शिक्षक पदांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षांकडून मंजूर करून घेणे अपेक्षित आहे. त्यानंतर त्यानुसार पवित्र पोर्टलवर तेवढी पदे अपलोड केली जाणार आहेत. त्यानंतर उमेदवारांना प्राधान्यक्रम भरावा लागणार आहे.

शेवटी मेरिटनुसार त्या त्या उमेदवारांना जिल्हा परिषदांच्या शाळांवर नेमणूक मिळणार आहे. खासगी शाळांना मात्र एका पदासाठी पवित्र पोर्टलवरील प्रत्येकी तीन उमेदवारांमधून एकाची निवड करायची आहे. ते तीन उमेदवार शालेय शिक्षण विभागच त्याठिकाणी पाठवणार आहे. त्यांच्या मुलाखती घेऊन एकाची निवड करणे क्रमप्राप्त आहे.

तत्पूर्वी, बिंदुनामावली व विषयनिहाय रिक्तपदांची संख्या, जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेने मागासवर्गीय कक्षाकडे पाठविलेल्या बिंदुनामावलीस या आठवड्यात मान्यता मिळेल, असा विश्वास प्राथमिक शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. त्यानंतर काही दिवसांत म्हणजेच साधारणतः: ऑक्टोबरमध्ये भरतीला सुरवात होईल.

विद्यार्थी कमी झाल्याने शिक्षक संख्येत घट

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १३ टक्के तर जमातीसाठी ७ टक्के, ‘भज-ब’ संवर्गासाठी अडीच तर ‘भज-क’साठी साडेतीन टक्के, ‘भज-ड’साठी दोन टक्के, ‘विमाप्र’साठी दोन तर इतर मागास प्रवर्गांसाठी १९ टक्के जागा राखीव आहेत. तसेच खुल्या प्रवर्गासाठी ४८ टक्के जागा आहेत. बिंदुनामावलीनुसार सध्या अनुसूचित जातीचे ४२, जमातीचे ३७४, ‘भज-ब’तील ४७ आणि खुल्या प्रवर्गाचे ३४० शिक्षक कमी आहेत. मात्र, सध्या पाच प्रवर्गातील २०२ शिक्षक जादा असल्याने ५८१ पदांचीच भरती होणार आहे. मागील काही वर्षांत जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या घटल्याने अशी स्थिती निर्माण झाली आहे.

आठ दिवसात बिंदुनामावलीची पडताळणी

जिल्हा परिषदेने त्यांच्या शाळांमधील शिक्षकांची मंजूर, कार्यरत व रिक्त पदांची बिंदुनामावाली मागासवर्गीय कक्षाकडे पाठविली आहे. उद्यापासून त्याची पडताळणी सुरु होणार असून त्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सहा कर्मचारी तिकडे रवाना झाले आहेत. आठ दिवसात बिंदुनामावलीची पडताळणी होणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com