जि.प. कर्मचारी पतसंस्थेसाठी ‘या’ कर्मचाऱ्यांचे १८ अर्ज! पहिल्याच दिवशी ‘सर्वसाधारण’साठी १२ उमेदवारी अर्ज; अर्ज भरण्याची ४ मार्चपर्यंत मुदत

जि.प. कर्मचाऱ्यांची पतसंस्था क्र. एकच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारी प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी सर्वसाधारण प्रतिनिधीसाठी आठ जणांनी १२ अर्ज, महिला प्रतिनिधीसाठी तीन, इतर मागासवर्ग प्रवर्गातून दोन, विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रतिनिधीसाठी प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाले आहेत.
Solapur News
Solapur Newssakal

सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची पतसंस्था क्र. एकच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारी (ता. २७) प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी सर्वसाधारण प्रतिनिधीसाठी आठ जणांनी १२ अर्ज, महिला प्रतिनिधीसाठी तीन, इतर मागासवर्ग प्रवर्गातून दोन, विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रतिनिधीसाठी प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आबा गावडे यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली ही पतसंस्था आहे. दरवेळी या पतसंस्थेवर सत्ता मिळविण्यासाठी दोन पॅनलमध्ये चूरस पहायला मिळते. यंदाही तशीच स्थिती पहायला मिळणार आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पतसंस्थेची निवडणूक जाहीर झाली आहे.

सर्वसाधारण प्रतिनिधी म्हणून १२, महिला प्रतिनिधी दोन, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जमाती व भटक्या जमाती- विमाप्र प्रतिनिधी असे प्रत्येकी एक संचालक असणार आहे. अर्ज केलेल्यांमध्ये सचिन मायनाळ, शत्रुघ्नसिंह माने, सुरेश कुंभार, शहाजहान तांबोळी, शिवानंद म्हमाणे, किरण लालबोंद्रे, विष्णू पाटील, सतिश देशमाने, विजयसिंह घेरडे यांनी सर्वसाधारण गटातून अर्ज केले. महिला प्रतिनिधी म्हणून मृणालिनी शिंदे, श्वेतांबरी राऊत यांनी अर्ज केले. इतर मागासवर्गीय प्रतिनिधीसाठी सचिन मायनाळ, विजयसिंह घेरडे यांनी तर अनुसूचित जाती-जमातीतून पहिल्या दिवशी एकही अर्ज आला नाही. विमुक्त जाती, भटक्या जमाती- विमाप्र यातून किरण लालबोंद्रे यांनी पहिल्या दिवशी अर्ज भरला आहे.

ठळक बाबी...

  • अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवाराला प्रत्येकी पाचशे तर इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी दोन हजार रूपयांचे डिपॉझिट

  • पतसंस्थेसाठी उमेदवारी अर्ज करण्यासाठी २७ फेब्रुवारी ते ४ मार्चपर्यंत मुदत

  • ५ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी, ६ मार्च रोजी प्रसिद्ध होणार पात्र उमेदवारांची यादी

  • ६ ते २० मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज माघे घेण्याची मुदत

  • २१ मार्च रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आणि २१ मार्च रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान, त्याच दिवशी मतमोजणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com