esakal | ZP Election : भाजपची स्पेस वाढतेय, शिवसेनेची अधिक घसरण - फडणवीस
sakal

बोलून बातमी शोधा

fadnvis

ZP Election : भाजपची स्पेस वाढतेय, शिवसेनेची अधिक घसरण - फडणवीस

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : राज्यात झालेल्या झेडपी आणि पंचायत समित्यांच्या पोट निवडणुकीनं हे सिद्ध केलं आहे की, भाजपची स्पेस वाढतेय पण दुसरीकडे शिवसेनेची स्पेस कमी होत असून ती अधिक खाली जात आहे, असा दावा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचा: NCBला रेव्ह पार्टीची माहिती देण्यासाठी गेलो होतो: भानुशाली

फडणवीस म्हणाले, राज्यातील सहाही जिल्हा परिषदेच्या मतदारांचे मी आभार मानतो कारण पुन्हा एकदा त्यांनी भाजपचा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून दिलं आहे. ही स्थानिक निवडणूक आसल्यानं भाजपनं निर्णय घेतला होता की, आमचे स्थानिक नेतेच ही निवडणूक हाताळतील. त्यामुळे मी, सुधीरभाऊ, चंद्रकातदादा कुठेही प्रचाराला गेलो नाही. तरी देखील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपलाच जनतेनं निवडून दिलं आहे.

हेही वाचा: रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोघांना; हे आहेत मानकरी

आपण जर एकूण मतांची फोड केली तर २२५ पैकी ५५ जागा म्हणजे २५ टक्के जागा भाजपला मिळाल्या आहेत. तर २५ टक्के जागा अपक्ष आणि इतरांना मिळाल्यात. तीन पक्ष एकत्र असूनही उरलेल्या ५० टक्क्यांमध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष अडकलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, राज्यात सत्ता असलेली शिवसेना चौथ्या क्रमांकाचा पक्ष झाली आहे तर भाजप पहिल्या क्रमांकावर आहे.

नागपूरच्या जनतेनं भाजपवरच जास्त विश्वास दाखवला

म्हणजेच ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजपवरच जनतेनं विश्वास दाखवला आहे. नागपूरमध्ये आमच्या पाच जागा होत्या तिथं तीन जागा मिळाल्या, दोन जागा थोड्या मतानं पडल्या. त्याचवेळी जिल्हा परिषदेत एक जागा जरी कमी झाली असली तरी पंचायत समितीत चार जागा वाढल्या आहेत. म्हणजे नागपूरच्या जनतेनं भाजपलाच जास्त जागा दिल्या आहेत. एकूण जर आपण या निवडणुकीकडं बघितलं तर पुन्हा एकदा भाजपची स्पेस वाढतेय आणि या तीन पक्षांची स्पेस कमी होतेय. त्यातल्या त्यात शिवसेना अधिक खाली जात आहे. हे या निर्णयातून स्पष्ट होतं, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

loading image
go to top