'मिनी विधानसभे'साठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

या जिल्हा परिषदांत मतदान : 
जळगाव, नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील 8 पंचायत समित्या

राज्यातील 15 जिल्हा परिषदा व 165 पंचायत समित्यांसाठी मतदान होणार 
मुंबई - "मिनी विधानसभा' मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची "दंगल' आज (गुरुवार) पार पडणार आहे. 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांसाठी एकूण 2 हजार 567 जागांसाठी 11 हजार 989 उमेदवार रिंगणात असून, 24 हजार 31 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली. 2 कोटी 4 लाख 4 हजार 300 मतदार मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. 

या निवडणुकीसाठी मतदानाची तयारी पूर्ण झाली असून, संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. यासाठी 24 हजार 31 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. 23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. गुरुवारी होणाऱ्या मतदानातून 15 जिल्हा परिषदांच्या 855 जागांसाठी 4 हजार 289 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

या जिल्हा परिषदांतर्गतच्या 165 पंचायत समित्यांच्या 1 हजार 712 जागांसाठी 7 हजार 700 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्व ठिकाणी इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे मतदान होणार असल्याने 72 हजार 93 बॅलेट युनिट आणि 48 हजार 62 कंट्रोल युनिट उपलब्ध करून दिले आहेत. या सर्वांसाठी 1 लाख 58 हजार 604 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

या जिल्हा परिषदांत मतदान : 
जळगाव, नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील 8 पंचायत समित्या 

एक दृष्टिक्षेप 
: जिल्हा परिषदा- 15 (जागा 855) 
: जिल्हा परिषदांसाठी उमेदवार- 4,289 
: पंचायत समित्या- 165 (जागा 1,712) 
: पंचायत समित्यांसाठी उमेदवार- 7,700 
: एकूण मतदार- 2,04,04,300 
: एकूण मतदान केंद्रे- 24,031 

Web Title: zp election in maharashtra